लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे
उरण दि २५ सप्टेंबररायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल, पेण व अलिबाग तालुक्यातील गावातील गेल इंडिया लिमिटेड या भारत सरकारच्या उपक्रमातून पेट्रोलियम व खनिज पाईप लाईन कायदा १९६२ मधील तरतुदीनुसार संबंधित गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीमधून जात आहे. सदर कायदयातील कलम ३ पीट कलम १ मधील तरतुदीनुसार नोटीसा कार्यालयामार्फत बाधित शेतक-यांना बजावण्याची कार्यवाही ही चालू करण्यात आली आहे. परंतु गेल इंडिया लिमिटेड कंपनीच्या पेट्रोलियम खनिज पाईप लाईन उपक्रमाला उरण तालुक्यातील कळंबुसरे येथील शेतकऱ्यांचे प्रचंड विरोध आहे. तसे विरोधाचे लेखी अर्ज गेल इंडिया कंपनीच्या सी.बी.डी बेलापूर येथील कार्यालयात शेतकर्यांनी दाखल केले आहेत.
सदर उपक्रमासाठी उरण उसर प्रोपेन पाईपलाईन रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील विविध गावांच्या हद्दीतून ही पाइपलाइन टाकण्यात येत आहे परंतु सदर उपक्रम राबविण्यात आले तर शेतकर्यांकडून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे,सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकरी संकटात असताना शेतकर्यांच्या म्हणण्यानुसार सदर मिळकतीतून देखील प्रोपेन वाहून नेणारी पाईपलाईन टाकल्यास शेतकऱ्यांना पिक घेणे अशक्य होऊन शेतकऱ्यांचे उपजिविकेचे साधनच नष्ट होणार आहे. त्याशिवाय भविष्यात सदर मिळकतीत शेतकऱ्यांना कोणताही इतर व्यवसाय,उपक्रम करता येणार नाही. त्याचप्रमाणे सदरच्या मिळकती हया इतर कोणत्याही प्रकल्पाकरीता संपादीत करणे शक्य होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सदर मिळकतीचे मोबदल्यात भविष्यात निर्माण होणारे प्रकल्प अथवा इतर उपक्रमातून मिळणारे फायदे यापासून सुध्दा वंचित रहावे लागेल. सदर मिळकतीतून शेतकऱ्यांना होणारे फायदे अस्तित्वात येण्यापूर्वीच नाहीसे होतील. त्यामुळे सदर मिळकतीतून प्रोपेन पाईपलाईन टाकल्यास सदरच्या मिळकती हया नापिक होऊन शेतकऱ्यांचे उपजिविकेचे साधन गेल कंपनी कडुन नष्ट होत असल्याने भविष्यात शेतकऱ्यांवर वायुगळती सारखे प्रकार झाल्यास शेतकऱ्यांच्या जीवीताला धोका निर्माण होणार आहे. याअगोदरही कळंबूसरे गावा लगतचे क्षेत्रामधुन एल पी जी पाईपलाईन गेलेली असल्याने त्यामध्ये बरेच क्षेत्र संपादीत झालेले आहे. सदर संपादीत क्षेत्राची नुकसान भरपाई प्रकल्पग्रस्त शेतक-यांना अदयाप मिळालेली नाही.त्यामुळे होवु घातलेल्या प्रकल्पास शेतकऱ्यांचा सक्त विरोध आहे. सध्या येणा-या पाईपलाईन व्दारे आणखी क्षेत्र नापिक होवुन शेतक-यांस त्यांचे उपजिविकेचे साधन असलेले भाताचे तसेच दुबार पिकाचे उत्पन्न घेता येणार नाही. त्यामुळे शेतक-यांवर भविष्यात उपासमारीची वेळ येणार आहे. तसेच सदर शेतजमीनीतुन पाईपलाईन टाकल्यास आजुबाजूचे क्षेत्र देखील लागवडीयोग्य राहणार नाही. म्हणुन सदर प्रकल्पास आम्हा शेतक-यांचा सक्त विरोध आहे.असे शेतकऱ्यांनी सांगितले. तसे पत्रव्यवहार देखील गेल कंपनीशी करण्यात आले आहे.