लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपना तालुक्यात लंपी स्किन डिसिजचा प्रादुर्भाव निदर्शनास आलेला आहे.कोरपना तालुक्यातील सांगोडा गावामध्ये लंपी स्किन डिसिज चे 2 गोवंशीय जाणावारंमध्ये लागणं झाल्याचे निदर्शनास आले. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या आदेशानुसार सांगोडा हे गाव लंपी स्किन डिसिज बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.व रोग प्रादुर्भावाच्या ठिकाणापासू 5 किलोमीटर चा परिसर सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.सतर्कता क्षेत्रात येणाऱ्या अंतरगाव बु कारवाई काढोली वानोजा हिरापूर नारंडा गाडेगाव विरुर अश्या एकूण 9 गावामध्ये डॉ.संदीप राठोड पशुसंवर्धन दुग्ध विकास विस्तार अधिकारी यांच्या निदर्शनाखाली शीघ्रकृत दलामार्फत 22 सप्टेंबर ला गोवंशी जाणावरांना लंपी स्किन डिसिज रोगाचे लसीकरण करण्यात आले.तसेच बाधित जाणवरांचे रोगनिदन करण्याकरिता रक्ताजल नमुने घेऊन औषधंउपचार करण्यात आले.सदर रोग हा विषाणूजन्य असून जाणवरांच्या अंगावर 10ते 20 मी. मी. व्यासाच्या गाठी भरपूर ताप डोळ्यातुन व नाकातून चिकट स्त्राव चारा पाणी कमी खाणे दूध उत्पादनात घट अशी लक्षणें दिसतात.
लंपी त्वच्या रोग हा औषधउपचाराणे निश्चित बरा होत असून आजारी जाणावरांचे विलगीकर करणे आवश्यक आहे पशुसंवर्धन विभागामार्फत बाधित व सतर्कता क्षेत्रात मोफत लसीकरण व आजारी जाणावरांना औषधंउपचार पशुपालकांच्या दारात करण्यात येत आहे.ग्राम पंचायत मार्फत जाणावरे व गोठ्याची फवारणी प्रतिबंधत उपाय म्हणून करण्यात येत आहे पशु पालकांनी घाबरू न जाता आजाराची लक्षणे आढळून आल्यास तात्काळ जवळच्या पशुवैधकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.
*लंपी स्किन डिसिज रोग हा प्राण्यांमधून मनुष्याला संक्रमित होत नसल्यामुळे जनावरांचे दूध मनुष्याला सेवनासाठी सुरक्षित आहे.*
( डॉ.संदीप राठोड.पशुसंवर्धन विकास विस्तार अधिकारी कोरपना )