लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर
चंद्रपूर:- केंद्रीय शहरी विकास तथा पेट्रोलियम मंत्री श्री हरदिप सिंह पुरी यांनी आपल्या चंद्रपूर दौऱ्यात केंद्रीय नोडल संस्था असलेल्या सिपेट (सेंट्रल इन्स्टिट्युट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरींग अँड टेक्नाॅलाॅजी) ला भेट देवुन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. विविध अभ्यासक्रमांची माहीती जाणून घेतली. तसेच या संस्थेच्या माध्यमातून रोजगाराभिमुख कार्याची तसेच कॅम्पस प्लेसमेंट मोठ्या प्रमाणात होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सिपेट च्या माध्यमातून आतापर्यंत 4500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या संस्थेतून प्रशिक्षण घेतले असुन यापैकी संपूर्ण राज्यभरातून 3500 विद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त झाल्याची माहिती मंत्री महोदयांना दिली. सिपेट व्यवस्थापनाने या संस्थेच्या माध्यमातून अधिकाधिक युवकांना प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करुन द्यावी. जेणेकरुन सुशिक्षित बेरोजगार युवकांना त्यांचा कौशल्यानुसार रोजगार प्राप्त होण्यास वाव मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
*सिपेटच्या अधिक रोजगाराभिमुखतेसाठी दोन शिफ्टमध्ये चालवा.- अहीर*
पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी चंद्रपूरातील सिपेट या केंद्रीय नोडल संस्थेच्या उभारणीसाठी मान. प्रधानमंत्री मोदी जी यांचे अमूल्य सहकार्य लाभल्याचे सांगितले तत्कालिन रसायन व उर्वरक मंत्री यांच्या सहकार्याबद्दल आभार मानून सिपेट संस्थेच्या माध्यमातून युवक, युवतींना प्रवेशाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देऊ शकलो याचा आनंद अधिक असल्याचे सांगितले.
पुणे, नाशिक, जळगाव, नागपूर, चंद्रपूर येथील विद्यार्थी प्रशिक्षण घेवुन रोजगाराची संधी प्राप्त करु शकले त्यामुळे सिपेट हे चंद्रपूर जिल्ह्याकरिता वरदान ठरले आहे. रोजगार मिळण्याची हमखास संधी असलेले हे केंद्र आहे, सदर केंद्र दोन शिफ्ट मध्ये चालविण्यासाठी सिपेट अधिकाÚयांनी केंद्राकडे प्रस्ताव सादर करावा. जेणेकरुन अधिकाधिक विद्याथ्र्यांना या प्रशिक्षणाची संधी प्राप्त होईल व युवकांना रोजगार मिळेल असेही त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.
या भेटीप्रसंगी भाजपा प्रदेश महामंत्री राजेश बकाने, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भजापा प्रदेश कार्यकारीणी सदस्य खुशाल बोंडे, माजी जि. प. सदस्य संजय गजपूरे, भाजपा जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, भाजयुमो प्रदेशउपाध्यक्षव्दय रघुवीर अहीर, अमित गुंडावार, माजी सभापती नागराज गेडाम, माजी नगरसेवक श्याम कनकम, किसान आघाडी जिल्हाध्यक्ष राजु घरोटे, श्याम बोबडे, सिपेट चे अधिकारी श्री जोशी, पुनम तिवारी, गौतम यादव यांचेसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.