पुणे मंगळवार पेठ येथे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जीवन कार्यावर सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न…!

 

लोकदर्शन पुणे 👉 राहुल खरात

आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक जयंती निमित्त मंगळवार दिनांक २० सप्टेंबर २०२२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, डॉ बाबासाहेब आंबेडकर चाैक, मंगळवार पेठ,पुणे, महाराष्ट्र येथे महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई आयोजित “आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जीवन कार्यावर सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले. या कार्यक्रमात शाहीर श्रीकांत रेणके आणि सहकारी यांनी सांस्कृतिक कार्यक्रम केला, गणेशवंदना,तालवाद्य वादन,उमाजी नाईक यांच्यावर आधारीत गीत आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जिवनपटावर आधारीत अंगावर शहारे आणणारा पोवाडा सादर झाला कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्र गीताने झाली,ढोलकी – राहूल कुलकर्णी सिंथेसायझर- दिपक पवार, भरत शर्मा, राहूल पवार यांनी साथसंगत केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ज्ञानेश्वर शिंदे यांच्या कडून झाले. पाहुणे श्री.संदीप ओव्हाळ अँड. राजेश म्हामुणकर रोहिदास दादा मदने, गंगाराम जाधव,सुभाष जाधव,शेखर गोरगले, सुरेश चव्हाण, शांताराम गोपने, प्रशांत गोपने, महेश म्हसुडगे, आरती ताई साठे,
हिराजी बुवा, संदीप शेळके, भूषण कांबळे, राजाराम निकम, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवरां कडून दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम करून त्यांना पुषपगुच्छ व श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.विकास सोनवणे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमासाठी संत असंख्य रसिक गणांनी कार्यक्रमाचा आनंद घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.कार्यक्रमाचे संयोजन आरयन देसाई यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here