राष्ट्रवादी महिला” आटपाडी तालुका उपाध्यक्षपदी* *गोमेवाडीच्या सौ . अर्चनाताई जगताप यांची नियुक्ती .

 

लोकदर्शन आटपाडी👉राहुल खरात

दि . २१ गोमेवाडी येथील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सक्रिय कार्यकर्त्या सौ . अर्चनाताई वसंतराव जगताप यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आटपाडी तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे पत्र राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्षा सौ अश्विनीताई कासार अष्टेकर यांनी दिले आहे .
राष्ट्रवादी काँग्रेसचे वक्ता सेलचे जिल्हाध्यक्ष प्रा. संतोष जाधव यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव सादिक खाटीक, राष्ट्रवादी वक्ता सेलचे तालुका अध्यक्ष प्रा.संताजी देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष सौ . अनिताताई पाटील, महिला राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षा सौ. अश्विनीताई कासार, तालुका उपाध्यक्षा आशाताई देशमुख, शहर अध्यक्षा सौ. उज्वलाताई सरतापे, मनिषा पाटील,
मनिषा विभुते, अर्चना जगताप, सविता कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत सौ .अर्चना जगताप यांना हे नियुक्ती पत्र राष्ट्रवादीच्या तालुका कार्यालयात देण्यात आले .
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री, आमदार श्री .जयंतराव पाटील यांना अभिप्रेत असणारी संघटना बांधणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मजबुती, बळकटीसाठी प्रयत्न करत सर्वसामान्यांपर्यत पक्षाची ध्येय धोरणे अर्चनाताई जगताप या पोचवतील अशा अपेक्षा सौ . अश्विनीताई कासार यांनी व्यक्त केली .
गोमेवाडी गाव व गोमेवाडी पंचायत समिती गणातील महिलांसाठी काही वर्षापासून सौ . अर्चनाताई जगताप या करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे . विद्यार्थी – विद्यार्थीनींनी, युवक – युवती, ज्येष्ट माता – भगिनी, विधवा, परितक्त्या, वंचित, उपेक्षित, मागास, अंध – अपंग इत्यादींसाठी केलेल्या त्यांच्य चांगल्या कार्याची दखल घेऊन आजपासून सौ . अर्चनाताई जगताप यांना राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या आटपाडी तालुका उपाध्यक्षपदी सन्मानाने नियुक्त केले जात आहे . लग्न होवून सासरी येईपर्यतचे अर्चनाताईंचे आयुष्य आटपाडीवाशीय म्हणून आटपाडी शहरातच व्यतित झाले आहे . त्या पार्श्वभूमीवर आटपाडी शहरासह संपूर्ण तालुकाही त्यांना माहीत आहे . त्यांचे संघटन कौशल्य, हृदयस्पर्शी संभाषण कला आणि प्रत्येक प्रश्नाशी भिडत ते सोडविण्याची त्यांची तळमळ, महिलांना जोडण्यास सर्वत्र उपयोगी ठरत आहे . याच कर्तव्य भावनेने त्यांनी गोमेवाडी गाव, गोमेवाडी पंचायत समिती गण आणि करगणी जिल्हा परिषद गटातील सर्व सामान्यांसाठी झगडावे, त्यांचे मोठे संघटन बांधावे , या सामुहीक महिला शक्तीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाढीसाठी प्रयत्न करावा आणि त्यामध्ये त्या मोठ्या प्रमाणात यशस्वी होतील . भविष्यातल्या लक्षवेधी कार्यासाठी त्यांना शुभेच्छा सदिच्छा देत सौ . अश्विनीताई कासार अष्टेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले .
तसेच राष्ट्रवादीचे गोमेवाडीचे नेते संपतराव पाटील, मुन्ना मुलाणी, साहेबराव कदम, उत्तमराव कदम, हरीभाऊ कदम, भरत सोहनी इत्यादी अनेकांनी सौ . जगताप यांचे अभिनंदन केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here