लोकदर्शन सांगली👉 राहुल खरात
दि. २० सप्टेंबर २०२२
आज वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे सांगली जिल्हा दौ-यावर आले होते. आगामी जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपरिषद, महानगरपालिका या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आले होते.यावेळी सांगली येथे पत्रकार परिषद पार पडली.या पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले, भविष्यात भाजपा सोडून इतर सर्व समविचारी पक्षा सोबत आम्ही युती करण्यासाठी आम्ही तयार आहोत पण अद्याप कोणाकडून कुठला प्रस्ताव आला नाही.
तसेच पाऊसाने शेतकरी हतबल झाला आहे. सोयाबीनचे पीक पाऊसामुळे खराब झाले आहे.तसाच हिरवेगार दिसते ते एक प्रकारचा वाळवंटच झाला आहे.हिरवगार असे काहीच राहिले नाही नुसता हिरवेगार वाळवंट आहे.
महाविकास आघाडी असून सुद्धा युतीमध्ये लढलेली नाही आम्ही एकत्र जाणार असे राष्ट्रवादी म्हणते विधानसभेची मुंबईची पोटनिवडणुक झाली शिवसेनेने उमेदवार घोषीत केला त्यामुळे काॅग्रेसने आम्ही दुसऱ्या नंबर वर होतो आम्हाला विचार करावा लागेल असे प्रतिपादन केले. राष्ट्रवादीचे शिवसेनेवर एकतर्फी प्रेम दिसून येत आहे असा घणाघात प्रकाश आंबेडकर यांनी सांगलीत केला आहे.तसेच देशाची राजेशाही अणि हुकुमशाही कडे वाटचाल सुरू आहे. मोदीनी वाढदिवस बघून चित्ता आणला आणी सर्वांना भिंती दाखवली की आता छू…ईडी,इन्कम टॅक्स,सीबीआय होत आता चित्ता आहे असा मोदींवर हल्लाबोल केला आहे.
शिवसेनेला दसरा मेळावा ही ताकद दाखवली जाते त्यामुळे हे सरकार त्यांना संधी देणार नाही त्यांनी दुसऱ्या दिवशी दसरा मेळावा करावा मी असतो तर हतबल झालो नसतो दुसऱ्या दिवशी मेळावा ठेवला असता असे देखील प्रकाश आंबेडकर यांनी दसरा मेळाव्याच्या वादावरून बोलताना म्हणाले. यावेळी सांगली जिल्हा प्रभारी संतोष सूर्यवंशी, राज्य उपाध्यक्ष प्रा. सोमनाथ साळुंके सर, डॉक्टर क्रांती ताई सावंत, जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे (दक्षिण), (उत्तर) जिल्हाध्यक्ष राजेश गायगावले, राजू मुलांनी, सुमेध माने आदी उपस्थित होते.