,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन👉,,(प्रा अशोक डोईफोडे)
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
अचानक मंडळ च्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा नवरात्र महोत्सव २०२२ साजरा करण्याकरिता वार्षिक बैठक स्थायी समिती अध्यक्ष नामदेवराव येरणे संयोजक हंसराज चौधरी यांच्या उपस्थितीत मंडळाचे वरिष्ठ सदस्य हरिश्चंद्र अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली दुर्गा माता मंदिरात संपन्न झाली. अनेक वर्ष कोषाध्यक्ष राहिलेले वरिष्ठ सदस्य स्वर्गीय महादेवराव वरभे यांना मंडळाच्या वतीने मौन श्रद्धांजली वाहिन्यांत आली. मागील वर्षाचे जमा खर्च टिकाराम चिव्हाणे यांच्या तर्फे सादर करण्यात आला त्यास सर्वानुमते मंजुरी प्रदान करण्यात आली.
या वर्षी शासनातर्फे कोरोना निर्बंध उठविण्यात आले असून येणारा नवरात्र महोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे ठरविण्यात आले. नवरात्र महोत्सव २०२२ साजरा करण्या करीता कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी प्रतिष्ठित व्यापारी ललित नंदवाणी कार्याध्यक्षपदी विवेक येरणे उपाध्यक्षपदी प्रशांत पोतनुरवार सचिवपदी पवन देरकर सहसचिव लक्की चौधरी कोषाध्यक्ष आशिष रोकडे, टीकाराम चिव्हाने महाप्रसाद समिती सदस्यपदी गुलाबराव शेंद्रे, डॉ. दादाजी डाखरे,हेमंत भाऊ वैरागडे, पाप्पया पोन्नमवार, हरिश्चंद्र अरोरा , अशोक पत्तीवार,लक्ष्मीकांत बाचकवार ,विठ्ठलराव कांबळे,सुनील ठाकरे,नरेश साहू, नानाजी गौरशेट्टीवार विसर्जन समिती सदस्य पदी डॉ विशाल धोटे,सुधीर कोटावार, प्रवीण झाडे ,रमेश कांबळे, गणेश वनकर, डॉ . निखिल डाखरे ,अविनाश शेटे, श्रीकांत पानघाटे, इंदर कश्यप यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. विविध शासकीय योजना शिबीर, आरोग्य मेळावा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम , भव्य दांडिया स्पर्धा , दररोज महाप्रसाद वितरण आणि इतर कार्यक्रम आयोजित करण्याचे तर रावण दहन न करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. सभेला नवनियुक्त कार्यकारणी पदाधिकाऱ्यांसह सुकेश पोतनुरवार, गणेश ठावरी, दिनेश पत्तीवार,ईशांत चौधरी ,किशोर धाबेकर, ओम कांबळे, पंडित रत्नेश दुबे उपस्थित होते. प्रास्ताविक व आभार विक्रम येरणे यांनी मानले.