.
लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा (ता.प्र) :– शासकीय अर्धशाशकिय सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित, राजुरा ची ५६ वी वार्षिक आमसभा साने गुरुजी सभागृह, देशपांडे वाडी, राजुरा येथे घेण्यात आली. या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण तथा सेवानिवृत्ती सभासदांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे म्हणाले की, कर्तुत्ववान माणसे ही कोणत्याही समाजाचे भुषण असतात. आपल्या पतसंस्थेने या कार्यक्रमातून जुन्या व नव्या पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी अतिशय सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केले. या सत्कारातून नवयुवक व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना नवीन ऊर्जा मिळून ते पून्हा नव्या जोमाने काम करतील अशी आशा आहे. तसेच सेवा सहकारी संस्थेने आपल्या आर्थिक प्रगती बरोबर सामाजिक दायित्वाचे भान असेच सदैव जपावे असे मत व्यक्त केले. या प्रसंगी संस्थेचे सर्व सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचारी तथा इयत्ता १० वी व १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचांदूर न प अध्यक्षा सविता टेकाम, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष अन्नाराव आडे, उपाध्यक्ष कैलाश म्हैसके, सचिव अंकुश कुळमेथे, संचालक प्रभाकर जूनघरे, राजेश देवगडे, संजय लांडे, उमाजी कोडापे, येशोधा राठोड, द्रोपदी दरेकर, अंबादास जाधव यासह सर्व सत्कारमुर्ती, गुणवंत विद्यार्थी, संस्थेचे सर्व संचालक, सभासद, शिक्षक वृंद उपस्थित होते.