लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,
सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित सावित्रीबाई फुले विद्यालय गडचांदूर येथे दिनांक १४ सप्टेंबरला हिंदी दिनानिमित्त वर्ग ५ते ८ साठी *खेलो का महत्व* तसेच ९ते १० करिता”वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन”या विषयावर निबंध स्पर्धा तसेच हिंदी कविता गायन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्वप्रथम विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मराज काळे यांनी विद्यार्थ्यांना हिंदी दिवसाचे व हिन्दी भाषेचे महत्व आपल्या मनोगतना मधून समजावून सांगितले.या प्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक संजय गाडगे तथा सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक तथा संचालन विद्यालयातील हिंदी भाषेचे शिक्षक महेंद्र कुमार ताकसांडे यांनी केले, त्यांनी प्रास्ताविकातून हिंदी भाषेचे महत्व राष्ट्रभाषेचा इतिहास कथन केला. या स्पर्धेकरिता विद्यालयातील शिक्षक जीवन आडे, सुरेश पाटील, तथा सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहकार्य केले.
,