ऍड,दीपक चटप याचा महात्मा गांधी विद्यालयात सत्कार

 

लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे या शाळेचा माजी विद्यार्थी ऍड. दीपक यादवराव चटप यास उच्च शिक्षणासाठी ब्रिटिश सरकारची चेव्हनिंग ग्लोबल लिडर्स शिष्यवृत्ती मिळाल्याबद्दल शाळेच्या वतीने 11 सप्टेंबर ला सत्कार व अभिनंदन करण्यात आले.
श्री प्रशांत धाबेकर यांनी प्रास्ताविकातून ऍड. दीपक चटप यांच्या जीवनावर प्रकाश टाकला .सत्काराला उत्तर देतांना ऍड.दीपक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यात त्यांनी विद्यार्थ्यांना तूच हो तुझ्या जीवनाचा शिल्पकार असे सांगितले ,शेतकरी कुटुंबातील सामान्य विद्यार्थी कठोर परिश्रम करून ठरवलेले उद्दिष्ट साध्य करू शकतो तसेच त्यांनी कायद्याचे शिक्षण समाजातील पीडित व गरजू लोकांसाठी उपयोगात आणायचे आहे असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापिका सौ स्मिता चिताडे यांनी दिपकला पुढील शिक्षणासाठी व पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.प्रा आशिष देरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्मिता चिताडे तसेच सत्कारमूर्ती ऍड. दीपक चटप तथा प्रमुख अतिथी उपमुख्याध्यापक श्री अनिल काकडे,पर्यवेक्षक श्री एच बी मस्की, प्रा.प्रफुल्ल माहुरे, प्रा.प्रदीप परसुटकर,प्रा ,सुधीर.थिपे,प्रा विवेक पाल, ,सहा शिक्षक श्री हरिहर खरवडे,, श्री शिवाजी मालेकर तथा विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन प्रा.सुधीर थिपे तर आभार प्रदर्शन श्री हरिहर खरवडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here