लोकदर्शन 👉 प्रा.अशोक डोइफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
आग आणि पाणी जितके जास्त उपयुक्त आहेत तिथकेच त्याचा अयोग्य वापर केल्यास ते विध्वंस सुद्धा करू शकतात.
खास करून समाजाला घरगुती आगीपासून आपली सुरक्षा कशी करता येईल याचे ज्ञान असने गरजेचे आहे हे लक्षात घेता अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन आवारपूर द्वारे महाव्यवस्थापक कर्नल दिपक डे यांच्या मार्गदर्शनात, श्री. प्रभू रामचंद्र विद्यालय, नांदा येथे २०० विद्यार्थी व शिक्षक वृंद यांच्यासमोर घरगुती आग सुरक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात सी.एस.आर. अधिकारी सचिन गोवारदीपे व श्री. प्रभू रामचंद्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ अनिल मुसळे यांच्या व्दारे मार्गदर्शन करण्यात आले. तर अल्ट्राटेक च्या सुरक्षा विभागाचे अधिकारी अनीकेत जोशी व वरून सिंग यांचे द्वारा प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले यात खास करून गँस सिलेंडरचा वापर सुरक्षित कसा केला पाहिजेत व गँस सिलेंडरला आग लागल्यास ती कशी विझवली पाहिजेत आणि अग्नी रोधकांचा कसा वापर करावा हे दाखविण्यात आले.
या प्रात्यक्षिकात विद्यार्थ्यांना व शिक्षकांना संधी देण्यात आली व त्यांच्या व्दारा प्रात्यक्षिक करवली गेली.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता सी.एस.आर. प्रमुख सतीश मिश्रा, सचिन गोवारदिपे, संजय ठाकरे, देविदास मांदाळे व श्री. प्रभू रामचंद्र विद्यालय च्या शिक्षकांनी अथक प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे महत्त्व लक्षात आल्याने सर्व विद्यार्थ्यांनी व प्राचार्यांनी अल्ट्राटेक चे आभार मानले.
,