लोकदर्शनउरण👉 विठ्ठल ममताबादे
दि १६ सप्टेंबर २०२२
१६ सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्र महासंघाने जागतिक ओझोन थर संरक्षण म्हणून घोषीत केला आहे. हा दिवस पर्यावरणासाठी अतिशय महत्वाचा असल्याने उलवे येथील वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कीर्ति कॉम्प्युटर इन्स्टिट्युड- उलवे येथील विद्यार्थ्यांना वृक्षारोपणासाठी रोपे देऊन एक विद्यार्थी – एक रोप अभियान भूषण पाटील आणि श्वेता धनावडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले.
ओझोन थर हा पृथ्वी व सजीवसृष्टीसाठी हानिकारक असणाऱ्या सुर्याच्या अल्ट्रा व्हायलेट अशा अतिनील किरणांपासून रक्षण करतो. मानव निर्मित प्रदुषणामुळे ओझोन थरांवर विपरित परिणाम होत असल्याने जगभर ओझोन थर संरक्षणासाठी विविध उपक्रम आणि उपाययोजना राबवित आहेतच शिवाय नव्या युवापिढीने ही ह्याचे गांभिर्य ओळखून दरवर्षी एक वृक्षाचे रोपन व जतन करुन पर्यावरण संवर्धनासाठी कटीबद्ध राहणे गरजेचे असल्याने किमान प्रत्येकानी एक रोप लागवड करावे असे मत संस्थेचे धनंजय तांबे यांनी आपल्या मार्गदर्शनातून केले. यावेळी संस्थेच्या वतीने कीर्ति कॉम्प्युटर इन्स्टिट्युटच्या २५ विद्यार्थ्यांना रोप वाटप करुन झाडांचे आणि पर्यावरणाचे महत्व पटवून प्रत्यक्ष रोप लागवडीसाठी संस्थेसोबत जोडण्याचे आवाहन केले.यावेळी आदर्श शिक्षक मो. का. मढवी, माजी भारतीय सैनिक निलेश म्हात्रे, पोद्दार इंग्रजी माध्यम शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या संभेराव, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी दत्ताराम भोसले, सर्पमित्र प्रणय पारिंगे, वटवृक्ष सामाजिक संस्थेचे किरण मढवी, गणेश मढवी आदी मान्यवरांच्या शुभहस्ते रोप वाटप करण्यात आले.