लोकदर्शन उरण 👉 (विठ्ठल
ममताबादे )
. . .
दि 14 रामचंद्र म्हात्रे विद्यालय आवरे येथे करियर मार्गदर्शन आणि मोफत एस टी बस पास वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीया फाऊंडेशन पाले अध्यक्षा व कॉमन सर्विस सेंटर कोप्रोलीच्या संचालिका स्मिता संदीप म्हात्रे, रामचंद्र म्हात्रे विद्यालयाचे प्राचार्य सुभाष ठाकूर , स्नेहा पाटील खोपटे व सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.शासनाच्या योजने अंतर्गत शाळेतील 6 वी ते 12 वीच्या 107 विद्यार्थिनींना मोफत एसटी बस पास वितरण करण्यात आले. तर श्रीया फाऊंडेशन पाले तर्फे 25 मुलींना ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग कोर्स मोफत देण्यात आला. यावेळी उपस्थित मुलींना मार्गदर्शन करताना करियर कसे घडवावे, ध्येय गाठण्यासाठी आजूबाजूच्या परिस्थिती चा कसा लाभ घ्यावा, दैनंदिन जीवनात शिक्षणाचा कसा वापर करावा, मोबाईलचा वापर आपल्या करियर साठी कसा करायचा, मोठी स्वप्ने बघून कसे ध्येय गाठायचे याबद्दल स्मिता म्हात्रे यांनी मार्गदर्शन केले. तर प्राचार्य सुभाष ठाकूर सर यांनी मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्व व त्याद्वारे आपले करियर कसे घडवायचे, आजूबाजूला कर्तृत्ववान माणसे असतात त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन आपले ध्येय कसे साध्य करायचे याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता म्हात्रे तर आभार प्रदर्शन सुश्मिता घरत यांनी केले. शिक्षक निवास गावंड व शिक्षक विद्याधर गावंड यांनी विशेष सहकार्य केले.