लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– सास्ती – राजुरा रस्त्याचे काम अतिशय संथगतीने सुरू असून या रस्त्यावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. दिवसेंदिवस येथून क्षमतेपेक्षा जास्त अवजड वाहतूक होत असल्याने रस्त्याची अतिशय दुर्दशा झालेली आहे. येथे ये – जा करताना परिसरातील विद्यार्थी, वेकोली कर्मचारी, तसेच सर्व नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे ही गंभीर बाब लक्षात घेऊन या रस्त्यावर क्षमतेपेक्षा अधिक अवजड वाहतूक थांबविण्यात यावी, रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अवजड वाहतूकीसाठी रेल्वे सायडींग ते गोवरी – मात्रा रोडवरून किंवा अन्य व्यवस्था करावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या नेतृत्वात सास्ती, धोपटाळा, रामपूर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. रस्त्याचे काम तातडीने पूर्ण न केल्यास काँग्रेसच्या वतीने स्थानिक नागरिकांना घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. या विषयावर लवकरच मिटिंग घेऊन ही समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन श्री. खलाटे यांनी दिले आहे.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, धोपटाळा चे माजी सरपंच राजाराम येल्ला, राजु पिंपळशेंडे, ग्रा प सदस्य जगदीश बुटले, ब्रिजेस जंगिडवार, संगीता हिवराडे, अनंता एकडे, संतोष शेन्डे, प्रा. प्रफुल्ल शेंडे, इंदूताई जांभूळे, रेखा लिंगे, मधुकर पोनलवार, शेख इक्बाल, दिनेश तल्लारी, स्वप्नील हिवराडे, विलास गोहणे, सखाराम गोहणे यासह सास्ती, धोपटाळा, रामपूर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.