लोकदर्शन अमरावती प्रतिनिधी👉
(राजू कलाने)
भारत सरकारच्या निर्देशानुसार संपूर्ण अमरावती जिल्ह्यात कुष्ठरोग्ण शोध मोहीम व सक्रिय क्षय रुग्ण शोध मोहीम राबविण्यात येत आहे. दिनांक 13 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत सदर आजारा विषयी कर्मचारी घरोघरी जाऊन घरातील व्यक्तीची तपासणी करणार आहेत. करिता सर्वसामान्य नागरिकांना सदर मोहिमेबाबत माहिती मिळावी तसेच त्यांच्या मनातील कुष्ठरोग व क्षयरोग विषयी असलेली भीती व अज्ञान दूर व्हावे या मोहिमेला अमरावती जिल्ह्यातील सर्व नागरिकांचा स्फुर्तपणे प्रतिसाद मिळावा या उद्देशाने सहाय्यक संचालक आरोग्यसेवा अमरावती व भारत स्काऊट गाईड जिल्हा कार्यालय अमरावती आणि विविध सेवाभावी संस्था यांच्या विद्यमाने रॅलीचे आयोजन दिनांक13 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 8:00 वा करण्यात आले. या रॅलीचे उद्घाटन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पांडा साहेब यांच्या हस्ते झाले. जिल्हा संघटक रमेश जाधव व वैशाली घोम यांच्या मार्गदर्शनात 100 पेक्षा अधिक स्काऊट गाईड सहभागी झाले.
नूतन कन्या शाळेच्या गाईड कॅप्टन श्रीमती अनिता पुनसे यांच्या मार्गदर्शनात गाईडचा बँडपथक आणि मोठ्या संख्येनी गाईड सहभागी झाल्या. कस्तुरबा कन्या विद्यालयाच्या गाईड कॅप्टन श्रीमती रघुवंशी व त्यांचे गाईड पथक तसेच महामना मालवीय विद्यालयाचे स्काऊट पथक व स्काऊट मास्टर यांनी सहभाग घेतला.