लोकदर्शन उरण 👉( विठ्ठल ममताबादे
दि 13 सप्टेंबर उरण-उसर प्रोपेन गॅस पाईपलाईन संदर्भात खोपटे गावातील शेतकऱ्यांनी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.उरण उसर प्रोपेन गॅस पाईपलाईन संदर्भात ग्रामस्थ व नागरिकांना येणाऱ्या समस्या याविषयी त्यांना निवेदन देऊन समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली.निवेदन स्वीकारताच खासदार कपील पाटील यांनी लगेचच संबंधित उपजिल्हाधिकारी अश्विनी पाटील मॅडम ह्यांना संपर्क करून या पाईपलाईन संदर्भात चर्चा केली आणि लगेचच स्वतः च्या लेटरहेड वर गेल (इंडिया) लिमिटेड कंपनी ला पत्रक लिहिले. या पाईपलाईन मुळे खोपटे मौजे धसाखोशी, कोप्रोली, मोठीजुई, कळंबुसरे, केळवणे, दिघाटी, साई गावातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे . हे नुकसान होऊ नये म्हणून केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढाकार घेतला आहे. ही पाईपलाईन रद्द करण्यात यावी किंवा तिचा मार्ग बदलण्यात यावा ह्याची मागणी उरण मधील ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते गोरख ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. 3(1) च्या आलेल्या नोटीसचे हरकती चे फॉर्म गेल इंडिया कंपनीला बेलापूर येथील त्यांच्या कार्यालयात देण्यात आले आहेत. सामाजिक कार्यकर्ते गोरख ठाकूर यांच्यासह खोपटे गावातील शेतकरी महेश भगत, चांगदेव ठाकूर व मनोहर म्हात्रे हे उपस्थित होते.