लोकदर्शन👉 मारोती चापले
*गडचांदूर*
औधोगीकरणाने गडचांदूर परिसरातील शेतजमिनीला सोन्याची झळाळी प्राप्त झाली त्यामुळे जमीनचे व्यवहारातून माणसाच्या जीवावर उठल्याची घटना काल दि.11 सप्टें ला गडचांदूर शहरात घडली . येथील वार्ड न .3 मधील राहवाशी असणारे विलास वासुदेव मांडवकर यांनी 11 सप्टेंबर च्या पहाटे विषप्राशन केले .त्याला उपचारासाठी चंद्रपूरला नेतानाच रस्त्यातच त्याच्या मृत्यू झाला .मात्र त्याच्या जवळ सापडलेल्या सुसाईड नोट मध्ये जमीन व्यवहारातून त्याला शरद जोगी ,प्रशांत पाचभाई यांचे कडून मिळालेल्या धमकी तुन दहशतीत आत्महत्या करीत असल्याचे विलास ने उल्लेख केल्याने शहरात खळबळ उडाली .
मृतक विलास यांनी मनोज शर्मा नामक इसमासोबत 60 लाख रुपयात 5 एकर त्याच्या आजीचे नावे असणाऱ्या शेतजमिनीचा सौदा केला होता .ती जमीन हायवेरोड मध्ये असल्याने त्याचा मोबदला आम्हाला मिळावा असे म्हटले होते .त्याचे सोबत दिनेश सोनी ,मनोज शर्मा ,बाळू घायवनकर ,गजानन गाणंफाले , पंकज गंपावार ,यांनी आमचे आई – वडिलांकडून 5 एकरच्या ठिकाणी 11.5 एकराची रजिस्ट्री करून घेतली .प्रशांत पाचभाई यांनी मला कुठंही जाऊ दिले नाही . शरद जोगी आणी प्रशांत पाचभाई यांनी पैशाचे आमिष दाखवून आमच्या कडून काम करून घेत होता .असे सुसाईड नोट मध्ये उल्लेख आहे .
वळगाव शेतशिवारात विलास याचे आजीचे नावे 11.5 एकर शेती होती त्याचे पैकी 5 एकर शेती विक्रीचा व्यवहार शरद जोगी यांचे सोबत झाला होता .मात्र 5एकरच्या ठिकाणी 11,5 एकराची रजिस्ट्री करून घेतले . चेक द्वारे पैसे दिले मात्र दबाव टाकून दिलेले चेक परत मागत होता .आह्मी नाही म्हणालो तरी दबाव टाकून एक चेक परत नेला ,दुसरा चेक वाटल्या मुळे त्याचे पैसे परत दे नाही तर तुझ्या ,बायको मुलांना मारतो अशी धमकी देत होते त्यामुळंच धमकीला घाबरून माझ्या बाबांनी आत्महत्या केल्याचे मृतक विलासच्या मुलाचे म्हणणे आहे .
*निपक्ष चौकशी करून गुन्हा दाखल* *करण्याचे पोलिसांचे सूचक आश्वासन*
विलासच्या आत्महत्या प्रकरणात निपक्ष चौकशी करून गुन्हेगार कितीही मोठा असला तरी गुन्हा नोंदवून अटक करू आणी त्याचेवर कायदेशीर कारवाही करू असे आश्वासन ठाणेदार सत्यजित आमले यांनी विलासच्या नातेवाईकांना दिला .
*राजकीय गोटात खळबळ*
मृतक विलास मांडवकर याचे सुसाईड नोट मध्ये उल्लेख असणारे शरद जोगी हे गडचांदूर नगरपरिषदचे विद्यमान उपनगराध्यक्ष असल्यामुळे जोगी यांना अटक होईल का ?झाली तर त्याच्या राजकीय भवितव्य काय आशा चर्चा राजकीय गोटात चर्चिल्या जात आहे .