लोकदर्शन👉 मोहन भारती
गडचांदूर- कोरपना तालुक्यातील तळोधी येथील शेतकरी संघटनेच्या २७ युवकांनी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षामध्ये घेतला. या प्रवेशामुळे गावात शेतकरी संघटनेला खिंडार पडले आहे.
आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की, तळोधी गावाच्या विकासासाठी नेहमीच कटीबद्ध असून युवकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार.
तळोधी गावात नेहमीच काँग्रेस विरुद्ध शेतकरी संघटना अशीच लढत होत होती. मागील झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस चे बहुमतात सदस्य निवडून येऊन सत्ता बसविली. मागील वर्षभरात आमदार सुभाष धोटे यांनी गावातील अनेक कामे मंजूर केली. हाच विश्वास ठेवून निलेश गोहोकार, सागर ताजने, प्रशांत जेणेकर, नितेश गोहोकार, अपुल पाचभाई, प्रभाकर ताजने, अतुल ताजने, अविनाश ताजणे, गुरुदेव ताजणे, विकास ठावरी, नवनाथ ताजने, सचिन सावनकर, धीरज केळझरकर, अमोल जुनारकर, नथ्थु गोहोकार, नामदेव गोहोकार, महेश ताजणे, उद्धव गोहोकार, संदीप जंबे, सुरज आवारी, दिनेश आत्राम, शंकर मडकाम, चेतन जेनेकर, प्रज्योत जेणेकर, हरीश वाढई या युवकांनी पक्ष प्रवेश घेतला.
यावेळी युवक काँग्रेसचे माजी विधानसभा अध्यक्ष प्रा.आशिष देरकर, तालुका अध्यक्ष शैलेश लोखंडे, माजी सरपंच रविंद्र गोहोकार, नाना जेणेकर उपस्थित होते.