लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या दिशानिर्देशनानुसार राज्यात सर्व विधानसभा क्षेत्रात मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार येणाऱ्या निवडणुकीपूर्वी मतदार याद्या अध्ययावत करण्यात येत आहेत. सदर विषयाचे महत्व लक्षात घेऊन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी आपले स्वतःचे आणि आपल्या संपूर्ण कुटुंबियांचे मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडून घेतले आणि सर्व नागरिकांनी आपल्या गावातील नजिकच्या केंद्रावर, बिएलओ किंवा तालुक्याच्या ठिकाणी प्रशासनाने केलेल्या सुविधा केंद्रात जाऊन आपल्या मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडून घ्यावे असे आवाहन राजुरा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना केले आहे. मतदार ओळखपत्र आधार कार्डशी जोडल्याने दुबार नावे वगळली जातील, मतदार यादी अधिक विश्वानीय बनेल आणि अवैध मतदारांना आळा बसेल तेव्हा सर्व नागरिकांनी प्रशासनाला या कार्यात सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
या प्रसंगी नायब तहसीलदार निवडणूक विनायक ओरगंटीवार, मंडल अधिकारी निरंजन गोरे यांनी आमदार सुभाष धोटे यांचे व कुटुंबीयांचे मतदार ओळखपत्र आधार कार्डशी जोडून घेतले.