लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपना,,
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ज्येष्ठ नागरिक संघ काटोल द्वारा आयोजित शैक्षणिक क्षेत्रातील भूषण स्व.चंपतराव बुटे स्मृती विदर्भ स्तरीय शैक्षणिक, सामाजिक, कार्य करणाऱ्या 20 सेवानिवृत्त शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य,विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांची निवड करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसर काटोल येथील ज्येष्ठ नागरिक संघ विरंकुडा केंद्रात सेवानिवृत्तांच्या कार्याची दखल घेऊन सन्मान कर्तुत्वाचा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
कोरपना येथील सेवानिवृत्त प्राचार्य संजय ठावरी यांचा गौरव करण्यात आला,या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंरणसिंगजी ठाकुर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती काटोल तर उद्घघाटक नागपूर विभाग शिक्षक आमदार मान. नागो गानार , गटशिक्षणाधिकारी संतोषजी सोनटक्के , गणेश शेंबेकर प्राचार्य लखोटीया विद्यालय कोंढाली, ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष रमेश तिजारे,सचिव गजाननराव भोयर, श्रीमती कोंडे ताई, व मान्यवर पाहुण्याचे उपस्थितीत सत्कार करण्यात आला.संचालन राठी सर, व राऊत मॅडम यांनी तर आभार श्यामराव झामडे यांनी मानले.कार्यक्रमास 250 चे वर ज्येष्ठ नागरिक मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी स्नेहभोजन झाले सेवानिवृताचे मनोबल उंचावून,त्यांचे आरोग्य जपणे, या उद्दात हेतूने हा संघ कार्य करत आहे . आपल्या उद्दघाटनिय भाषणातून गाणार साहेब यांनी सेवानिवृतास सुध्दा शासनाने कॅशलेस वैद्यकिय सुविधा पुरविणे गरजेचे असल्याचे प्रतीपादान केले. व इतरही बाबी मांडल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचा ट्रॉफी देऊन सन्मानित केले तर सुधीरजी बुटे सर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. निसर्गरम्य परिसरात हा सोहळा पार पडला. व प्रारंभि माधवबाग कोंढाली तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले.
,,