लोकदर्शन👉मोहन भारती
=============================
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्य, अष्टपैलू संस्कृती कला अकादमी, मुंबई(महाराष्ट्र राज्य मान्यता प्राप्त)द्वारा आयोजित *राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर ची विदयार्थीनी कु स्वीटी अनिल राठोड (वर्ग १२ वा) हिला उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झाला* स्वीटी राठोड हिला या स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन प्रा. प्रशांत खैरे यांनी केले.
कनिष्ठ महाविद्यालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत एखाद्या विद्यार्थ्यांला हे यश मिळाले याबद्दल सर्वत्र तिचे अभिनंदन होत आहे.या स्पर्धेमध्ये राज्यभरातून जवळपास 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे तिला मिळालेले हे यश मोठे आहे.कनिष्ठ महाविद्यालयाचा नावलौकीक केल्याबद्दल संस्थाध्यक्ष डॉ आनंदरावजी अडबाले ,संस्था उपाध्यक्ष तुळशीरामजी पुंजेकर, संस्था सचिव नामदेवरावजी बोबडे तथा सर्व संचालक मंडळ, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डी आर काळे तथा सर्व प्राध्यापकवृंद व विद्यार्थ्यांनी तसेच अष्टपैलू संस्कृती कला अकादमी चे संस्थापक अध्यक्ष शिवाजी खैरे सर यांनी तिचे अभिनंदन केले व पुढील वाटचाली करिता तिला शुभेच्छा दिल्या.