लोकदर्शन👉 प्रा.जी. राऊत
विदर्भ महाविद्यालय जिवती येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्रदान पंधरवाडा अंतर्गत राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण व दृष्टी क्षीणता कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी जागतिक साक्षरता दिनाचे औचित्य साधून सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथील नेत्र शल्य चिकित्सक. डॉ. बुरहान यांनी डोळ्यांचे विविध आजार, आजाराची कारणे व घ्यावयाची काळजी याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. नेत्रदान पंधरवाडा या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत डॉक्टर बुरहान यांनी नेत्रदानाचे महत्त्व व गरज याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. एस .एच. शाक्य यांनी विद्यार्थ्यांना नेत्रदानाचा संकल्प करण्याचे आवाहन केले. महाविद्यालयातील १०० विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी नेत्रदानाची शपथ घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गजानन राऊत यांनी केले तर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. संजय कुमार देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लांडगे सर, तेलंग सर, पानघाटे सर, साबळे सर, वासाडे सर, मंगाम सर, अनिल नळे व गणपत मेश्राम यांनी परिश्रम घेतले.