सावित्रीबाई फुले विद्यालयात स्वयंशासन कार्यक्रम संपन्न*

 

लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालयात दिनांक ५ सप्टेंबर २०२२ला भारताचे दुसरे राष्ट्रपती ,थोर तत्त्ववेत्ता, महान शिक्षणतज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मराज काळे होते . प्रमुख मार्गदर्शक म्हणून पर्यवेक्षक संजय गाडगे , कु. ज्योती चटप उपस्थित होत्या. याप्रसंगी मान्यवरांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला अभिवादन केले तसेच त्यांच्या जीवन कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली .मानवी जीवनात गुरूंचे महत्त्व वैदिक काळापासून महत्वपूर्ण आहे. गुरु शिवाय मार्ग नाही त्यामुळे शिक्षकांविषयी आदर विद्यार्थ्यांनी बाळगावा असा संदेश दिला. या कार्यक्रमाचे संचालन तथा प्रास्ताविक सेवा जेष्ठ शिक्षक महेंद्रकुमार ताकसांडे यांनी केले.
शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यां करिता स्वयंशासन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी अशा प्रकारच्या भूमिका साकारून आज संपूर्ण दिवस विद्यालयाचे कामकाज सांभाळले यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होईल व शिक्षकांविषयी आदर भावना वृद्धिंगत होईल. या उपक्रमाकरिता नामदेव बावनकर ,राजेश मांढरे, माधुरी उंमरे,भालचंद्र कोगरे जीवन आडे ,सी.एम. किन्नाके, आत्राम सर, मेश्राम सर ,तसेच शशिकांत चन्ने इत्यादींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मदत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here