लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर:
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर विद्यालय कोडशी बू. येथे 6 सप्टेंबर ला ब्रिटिश सरकारची चेवनिंग शिष्यवृती प्राप्त विद्यार्थी ॲड. दीपक चटप यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार ॲड. वामनराव चटप हे होते तर प्रमुख अतिथि म्हणून जिल्हा परिषद सदस्या विनाताई मालेकर,माजी जिला परिषद सदस्य निलकंठराव कोरांगे, अरुण पा. नवले जिलाध्यक्ष शेतकरी संघटना माजी पंचायत समिति सदस्य रमाकांत मालेकार , दिनकर पाटील मालेकार ज्येष्ठ कांग्रेस नेते, सुरेश पटेल मालेकर कांग्रेसी नेते, डॉक्टर नीलकंठराव मोहितकर, भाऊराव पा. मोहितकार, बापूजी पाटिल कोल्हे,माजी प्राचार्य सुरेशराव मोहितकर माजी प्राचार्य संजय ठावरी ,सचिन मालेकर, पांडुरंग वासेकर, दिलिप मालेकर, वासुदेव गोवरदिपे, नत्थू भोयर, पोलिस पाटील पांडुरंग जरीले, राजश्री विनोद रागीट व एस एस सी गुणवंत विद्यार्थी यांचि उपस्थिति होती.कार्यक्रम चे सुरुवातीस प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन झाले. ॲड. दीपक चटप व सम्मान कर्तुत्वाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प्राचार्य संजय ठावरी यांचा ही अरुण नवले व नीलकंठ कोरांगे यांचे हस्ते सम्मान करन्यात आला. रमाकांत मालेकार, अरुण नवले,प्राचार्य ठावरी यांनी विचार व्यक्त केले दीपक चटप यांनी आपल्या जडन घड़न बद्दल माहिती दिली व जीवनात तिन र पासुन दूर राहन्याचा सल्ला देत ग्रामीण भागातील मुलानी स्पर्धेच्या युगात मेहनत, जिद्द, परिश्रम करण्याच आवाहन केले, तर चटप साहेब यानी मोलाचा उपदेश केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सातपुते मुख्याध्यापक यानी केले तर संचालन वासेकर यांनी केले तर आभार खाडे यानि मानले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी बगडे , वसंतराव बोबडे, बंडु गेडेकर मोहितकर, यानी परीश्रम घेतले शेवटी राष्ट्रवंदना ने कार्यक्रम संपन्न झाला.