लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,
राज्य भरातील जि.प. खाजगी संस्थेच्या शाळामध्ये असणारी हजारो रिक्त पदे भरून ग्रामीण तथा शहरी भागातील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष देण्याऐवजी भाजपाचे आमदार प्रशांत बंब विधानसभेत बोलतांना शिक्षकांचा अवमान आणि अपमान कसा होईल. अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करतात. याबाबींचा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ विदर्भातील सर्व जिल्हयामध्ये शिक्षणाधिकारी (माध्य.) यांच्या कार्यालयासमोर दिनांक 1 सप्टेंबर रोजी 4ः30 वाजता सर्व शिक्षक, शिक्षिका एकत्र येवून त्यांनी विमाशि संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात चंद्रपूर येथे जोरदार निशेध आंदोलन करण्यात आले.
आमदार प्रशांत बंब हे नेहमी वादग्रस्त वक्तव्य करतात. आजच्या परिस्थितीमध्ये शिक्षकांना शाळेत शिकवण्यापेक्षाही अनेक अशैक्षणिक कामे करावे लागतात. बऱ्याच शाळांमध्ये विषयात आणि वर्गात शिकविण्याला शिक्षक नाही. शाळांमध्ये सुविधांचा अभाव आहे. वास्तविकता शाळांशाळामध्ये असणाऱ्या रिक्त पदावर शिक्षकभरती कशी होईल. ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कसे देता येईल. शिक्षकांच्या अडचणी समजून घेवून त्या कशा सोडवायच्या व शासनाला ते करण्यास भाग पाडावयाचे अशी भुमीका आमदार प्रशांत बंब न करता परिस्थितीचा विपर्यास करून जनतेचे लक्ष शासनाच्या कमजोर बाजूंवरून ग्रामिण भागात शैक्षणिक क्षेत्रात शासनाच्या गोंधळाकडून लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी आमदार प्रशांत बंब सारखे उचापती आमदार शिक्षकांना असभ्य व शिक्षकांचा अवमान करणारी वक्तव्य करतात याचा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जाहीर निषेध करीत आहे. आणि म्हणूनच 1 सप्टेंबरला 4ः30 वाजता शिक्षणाधिकारी (माध्य.) यांचे कार्यालयासमोर सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांचे नेतृत्वात महाराष्ट्र राज्य माध्य. शिक्षक महामंडळाचे सहकार्यवाह जगदीश जुनगरी यांच्यासोबत जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले.
या निदर्शने निषेध आंदोलनात जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे,जिल्हाकार्यवाह श्रीहरी शेंडे,प्रसिध्दी प्रमुख प्रभाकर पारखी,मुख्याध्यापक बरपात्रे, प्रा.ज्ञानेश्वर सोनकुसरे,वाल्मीक खोब्रागडे,सुरेंद्र अडबाले,मनोज वासाडे,अजय शास्त्रकर,महेश पाणघटे,भालचंद्र धांडे,वसुधा रायपूरे,कुरेकर मॅडम, कोटेवार मॅडम,बेर्डे सर,उपसे सर,हर्षाली मत्ते, उधरवार मॅडम,पंकज येरणे,उपासे सर,कुबडे सर,प्रणव उलमाले,घागी मॅडम, जांभुळे मॅडम,प्रकाश उरकुंडे, पोडे मॅडम, ठावरीमॅडम,अर्चना काळे मॅडम, वेटे मॅडम,साधना कुमार मॅडम,शहा मॅडम,पतरंगे सर,सचिन मोहित्कर,देवेंद्र बल्की, व जिल्हाभरातून मोठ्या संख्येने शिक्षक, बंधू, भगिनी मोठ्या संख्येनी उपस्थित होते. सर्वांनी आमदार प्रशांत बंब यांचा जाहीर निषेध केला.
,