हिंदू धर्मगुरू दशनाम गोस्वामी आखाडा संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश पुरी च्या जन्मदिवसानिमित्य रक्तदान!
* देहदान,रक्तदान ही देशसेवाच!- योगेश बन.
लोकदर्शन👉 मोहन भारती
नागपूर(प्र.) कोरोना कालांतरची स्थिती लक्ष्यात घेता रक्तदान, देहदान या सारखे उपक्रम राबविणे ही आज काळाची गरज आहे.जन्मदिवसा सारख्या आनंदाच्या पर्वतावर असे उपक्रम राबविले तर ती ही खरी देशसेवाच ठरू शकते असे महत्वपूर्ण प्रतिपादन शिक्षक नेते योगेश बन व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे व्याख्याते डॉ. मुकेश वाघमारे यांनी व्यक्त केले.दशनाम गोसावी संघटनेचे नागपूर जिल्हाध्यक्ष गणेश पुरी यांच्या वाढदिवसानिमित्य मेडिकल चौकातील पंडित बछयराज व्यास विद्यालयातील सभागृहात आयोजित रकदान शिबिरा प्रसंगी ते विचार व्यक्त करीत होते.
शिबिराचे उदघाटन शिक्षक नेते योगेश बन यांच्या हस्ते व प्रियदर्शनी शिक्षण महाविद्यालयाचे प्रा.सुभाष खाकसे,संघटनेचे राज्य नेते अशोक गिरी,रेल्वे चे अधिकारी श्रीकांत भांबुलकर ,डॉ.किशोर गिरी यांच्या उपस्थितीत सम्पन्न झाले.या विशेष उपक्रमा बद्दल जिल्हा संघटनेचे पदाधिकारी बाबा गिरी,आर के पुरी,अशोक गिरी,विकास पुरी,विकास गिरी,नरेंद्र गिरी,सुमित पुरी,प्रसाद गिरी,जय पाटील यांनी आयोजक व सत्कार मूर्ती गणेश पुरी व त्यांची पत्नी श्रद्धा पुरी यांचा शॉल, श्रीफळ ,भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.प्रा.सुभाष खाकसे,अशोक गिरी यांनी ही समयोचित विचार व्यक्त करून या उपक्रमाचे कौतुक केले. या प्रसंगी केंद्र प्रमुख नारायण चाफले, शिक्षण विस्तार अधिकारी नरेश भोयर,अमृत तुमसरे,नरेंद्र पुरी,अनिल पुरी इ.उपस्थित होते.संचालन व आभार विकास गिरी यांनी व्यक्त केले.तदनंतर जीवन ज्योती रक्तपेढी चे डॉ.अनिल नामपल्लीवर ,डॉ.किशोर खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ञ चमू ने रकदान कार्यवाही पूर्ण केली. वाढदिवसा निमित्य सत्कारमूर्ती गणेश पुरी यांचा मित्र परिवार व दशनाम गोसावी संघटनेच्या पदाधिकाऱयांनी रक्तदान करून आपले सामाजिक दायित्व पूर्ण केले.