लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
राज्यातील नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नव उद्योगाना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण 2018 जाहीर करण्यात आले आहे. सदर धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणी साठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी ही नोडल एजन्सी म्हणून कार्यरत आहे. राज्यातील नागरिकांच्या नवसंकल्पनाना मूर्त स्वरूप देण्यासाठी शासनामार्फत महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचे आयोजन करण्यात आले आहेत, महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा अंबुजा औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, गडचांदूर येथे पोहचताच प्राचार्य प्रमोद खडसे यांनी स्वागत केले,समन्वयक आदित्य भागवत यांनी स्टार्टअप यात्रेबाबत व्हिडीओ च्या माध्यमातून माहिती दिली, व्यावसायिक अभ्यासक्रम च्या विद्यार्थ्यांनी नवसंकल्पना घेऊन उद्योग सुरू करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी नोंदणी करून सादरीकरण करावे,शासनाच्या वतीने पारितोषिके सुद्धा देण्यात येणार आहेत, तेव्हा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन आदित्य भागवत यांनी केले, प्राचार्य प्रमोद खडसे,महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथील एम सी व्ही सी विभागाचे प्रमुख प्रा, अशोक डोईफोडे यांनी मार्गदर्शन केले, याप्रसंगी नरेश सुपे,संदीप तोडे,प्रफुल्ल बोरकुटे,धर्मेंद्र बेलोरकर, प्रा आरजू आगलावे,प्रा माधुरी पेटकर तथा अधिकारी व कर्मचारी ,विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रफुल्ल बोरकुटे यांनी केले.
कार्यक्रमात अंबुजा औद्योगिक प्रशिक्षण केंद्र चे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी तसेच महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथील एम सी व्ही सी चे विद्यार्थी सहभागी झाले होते.
,,