खिर्डी येथे आमदार सुभाष धोटे यांनी केली मंगलमूर्तीची स्थापना. धोटे परिवार जपत आहेत १०० वर्षाहून अधिक जुनी परंपरा.

 

लोकदर्शन👉 मोहन भारती

 

राजुरा :– आमदार सुभाष धोटे यांनी आपल्या मुळ गावी म्हणजे खिर्डी येथील घरी गणरायाची स्थापना करून दर्शन घेतले. या प्रसंगी सौ. शुभांगीताई धोटे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष शेखर धोटे, प्रदीप धोटे, अजय धोटे, अभिजित धोटे व त्याच्या परिवारातील अन्य सदस्यांचीही उपस्थित होती. धोटे परिवाराचा हा गणपती त्यांचे आजोबांच्या काळापासून सुरू असून १०० वर्षाहून अधिक जुनी परंपरा आजही कायम आहे. यानिमित्ताने सर्व कुटुंब एकत्र येत स्थापनेच्या दिवशी आपल्या मूळ गावात हजर राहू गणरायाची आराधना करतात.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *