मंगी (बु) येथे स्वच्छता अभियान, वृक्षबंधन, जागतिक क्रीडा दिवस संपन्न ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, अंबुजा सिमेंट फाउन्डेशन, उपरवाही यांचे मोलाचे योगदान

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर-👉(प्रा, अशोक डोईफोडे)
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
राजुरा तालुक्यातील स्मार्ट ग्राम मंगी (बु) येथे 29 ऑगस्ट 2022 ला संपूर्ण स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली. त्याप्रसंगी गावाची संपूर्ण स्वच्छता करण्याचा निर्धार करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे रक्षाबंधन करुन गावातील वृक्षांना सुध्दा राखी बांधून वृक्षबंधन कार्यक्रम पार पडला. त्यानंतर शाळेत जागतिक क्रीडा दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. बक्षिस स्वरुपात रजिस्टर व पेन भेट देण्यात आल्या. यासाठी अंबुजा फाउन्डेशन, उपरवाही यांनी मोलाचे सहकार्य केले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्मार्ट ग्राम पंचायत मंगी (बु) चे प्रशासक विजय परचाके (विस्तार अधिकारी (शिक्षण),पं.स.राजुरा) हे होते तर विशेष अतिथी म्हणून अंबुजा सिमेंट फाउन्डेशनचे कार्यक्रम व्यवस्थापक श्रीकांत कुंभारे, राजुराचे विस्तार अधिकारी (पंचायत) रविंद्र रत्नपारखी, अंबुजा सिमेंट फाउन्डेशनचे जितेंद्र बैस, सरोज अंबागडे, मानोलीचे केंद्रप्रमुख विलास देवाळकर, पांढरपौनीचे केंद्रप्रमुख दिनकर सोनटक्के, ग्राम पंचायतचे माजी उपसरपंच वासुदेव चापले, सदस्य शंकर तोडासे, ग्रा. पं. सचिव गजानन वंजारे, संपती पा. कुमरे, बी आर सी राजुराचे मुसा शेख, राकेश रामटेके यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. शाळेचे मुख्याध्यापक रत्नाकर भेंडे यांनी उत्कृष्ठ नियोजन करुन कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. या नाविण्यापुर्ण कार्यक्रमामुळे शाळेत व गावात एक आनंददायी व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक सुधीर झाडे स्पर्धेची जबबदारी पार पाडली तर श्रीनिवास गोरे, मारोती चापले यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. तसेच शाळेच्या शिक्षणपरी कु. शैला जयपाल मडावी, सौ. जया राजू मोहितकर, ग्राम पंचायतचे कर्मचारी नितीन मरस्कोल्हे, चरणदास चिलकुलवार, शालेय पोषण आहारचे स्वयंपाकी अनुसयाबाई कुळसंगे, फुलाबाई सिडाम यांनी क्रीडास्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here