लोकदर्शन👉(विठ्ठल ममताबादे
उरण दि 29 ऑगस्ट उरण तालुक्यातील खोपटे गावातील नाना नानी पार्क अस्थिविसर्जन घाट येथे मृत्यू नंतर दशक्रिया विधिला अस्थीविसर्जन करण्यात येतात. येथे नाना नानी पार्क, अस्थिविसर्जन घाटाला लागूनच खाडी आहे. समुद्राचे पाणी येथे मोठ्या प्रमाणात येते. त्यामूळे पाय घसरून जिवितहानी होउ नये, सर्वांना व्यवस्थित अस्थी विसर्जन करता यावे व अपघात घडू नये म्हणून या अनुषंगाने जरी मरी क्रिकेट क्लब खोपटे बांधपाडाच्या माध्यमातून नाना नानी पार्क येथे अस्थि विसर्जन घाटाच्या समुद्रातील पाण्यात उतरण्याच्या रस्त्याला हात धरुण चालण्यासाठी संरक्षक लोखंडी पाईप लावण्याचे काम करण्यात आले .सदर कार्याचे काम या वर्षी आयोजित केलेल्या क्रिकेट सामन्यातून मिळालेल्या आर्थिक नफ्यातून करण्यात आले.सदर उद्घाटन 28/8/2022 रोजी सकाळी 11 वाजता नाना नानी पार्क येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेना उरण तालुका संघटक बी एन डाकी , ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष विश्वनाथ पाटील,बांधपाडा ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच सुजित म्हात्रे, उद्योगपती कैलास म्हात्रे, माजी सरपंच भावना म्हात्रे, उदयोगपती योगेश पाटील, परेश प्रदिप ठाकूर, राजू दादा समर्थक नरेंद्र पाटील, बांधपाडा अध्यक्ष प्रकाश ठाकर, मनसे सरचिटणीस बबनदादा ठाकर, सातपाडा अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. अस्थिविसर्जन ठिकाणी लोखंडी पाईप लावल्याने होणारे अपघात,धोका टळल्याने या कामाचे सर्वत्र कौतूक होत असून हे काम केल्याबदल सर्व जनतेने, ग्रामस्थांनी काम केलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले आहेत.