भुस्खलनग्रस्त परिवाराला भाजपातर्फे प्रत्येकी 3 हजाराची मदत

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर

घुग्घुस शहरातील भुस्खलनग्रस्त अमराई वार्डाच्या भागाची पाहाणी शनिवारी, २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी वनमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी केली होती पाहाणी दरम्यान भुस्खलनग्रस्तांना भाजपातर्फे प्रत्येकी ३ हजार रुपये देण्याची घोषणा केली.
शासनातर्फे प्रत्येक परिवाराला १०००० दहा हजार रुपये सुद्धा सुधीरभाऊच्या प्रयत्नाने मिळणार आहेत.

त्याअनुषंगाने रविवारी, २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात अमराई वार्डातील भुस्खलनग्रस्त ज्यांना स्थलांतरित करण्यात आले आहे अश्या प्रत्येक परिवाराला तीन हजार रुपये रोख मदत देण्यात आली.

शनिवारी, सायंकाळच्या सुमारास अमराई वार्डातील काही घरांच्या भिंतीना भेगा पडल्यामुळे अनेक घरातील कुटुंबियांना सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनातर्फे जि.प.शाळेत हलविण्यात आले.

शुक्रवारी, २६ ऑगस्ट रोजी अमराई वार्डात राहणारे गजानन मडावी यांचे घर शेकडो फूट जमिनीत खाली धसले होते. त्यामुळे येथील अनेक घरांना खाली करून हलविण्यात आले आहे. अचानक घडलेल्या प्रकाराने परिसरात धास्ती निर्माण झाली आहे.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे निरीक्षण तांड्रा, संजय तिवारी, चिन्नाजी नलभोगा, संजय भोंगळे, अमोल थेरे, विवेक तिवारी, बबलू सातपुते, प्रवीण सोदारी, खलील अहमद, असगर खान, कोमल ठाकरे, धनराज पारखी, सुनीता पाटील, सुनंदा लिहितकर भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here