*श्री गजानन मडावी यांचे घर भूस्खलन* झाल्याने *पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर* यांनी भेट दिली

लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर

*दि २६ ऑगस्ट* रोजी *घुघुस* येथे पिट-२ अंडरग्राउंड च्या सर्फेस वर असलेले *श्री गजानन मडावी यांचे घर भूस्खलन* झाल्याने जवळपास ६० ते ७० फूट जमिनीच्या आत गेले. *पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर* यांनी जणया ठिकाणी भेट दिली व वेकोलि अधिकाऱ्यांसह पाहणी केली. आजूबाजूला लागून अजून घरे असल्याने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ कार्यवाही करण्याचा सूचना यावेळी अहिर यांनी वेकोलि वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक यांना केल्या. CMPDI व DGMS यांच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे अंडरग्राउंड खाणींमध्ये रेती भरणे, नागरिक सुरक्षित राहतील, पुन्हा pot hole होणार नाही यासाठी त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना व भविष्यात अश्या घटना घडणार नाही याची दखल घेण्याचे निर्देश ही त्यांनी यावेळी वेकोलि अधिकाऱ्यांना दिले. यावेळी वेकोलि चे क्षेत्रीय महाप्रबंधक आभासचंद्र सिंग, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी जि.प. सभापती ब्रिजभूषण पाझारे, विवेक बोडे, संजय तिवारी, निरीक्षण तंद्रा, संतोष नुने, विनोद चौधरी, अजगर खान, पूनम तिवारी, गौतम यादव यांचेसह अन्य पदाधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, वेकोलि चे सर्वे अधिकारी, नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here