लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
वरोरा
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
वरोरा तालुक्यातील पांझुर्णी येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत कमिटी आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत महात्मा गांधी तंटा मुक्ती गाव समिती पांझुर्णी/नांद्रा च्याअध्यक्ष पदी पाचव्यांदा मारोतराव गुडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गेल्या चार वर्षा पासून अध्यक्ष पदावर मारोतराव गुडेकर कार्यरत आहेत त्यानी महसूल, दिवानी, फौजदारी,सरकारी,तंट्यावर आळा घातला आणि कसेही तंटे आले तरी त्यांचा निपटारा करण्यात आला पुर्ण पणे तंटे मिटवले आणि पांझुर्णी/नांद्रा गाव तंटामुक्त गाव झाला तसेच हगणदारी मुक्त झाला. जुगार, दारुनशा, मुरुमउत्खनन, हिस्सेवाटनी, शिवधुरा, पांदन रस्ता, घरतंटा, शेती तंटा, धुरा तंटा, पाणी तंटा, गाव तंटा, गावातील जनावरे कत्तल विक्रीसाठी बंदी,रानटी जनावरे मारण्याची बंदी, गावातील व्यवहार देवाणघेवाण बरोबर चालावे, महिला बचत गट चालावे, देवस्थान मंदिर, शेतकरी गट ,शेतमजुरी गट.,कार्यरत आहेत,गावात समाज सेवा करीत आहे. पांझुर्णी आणि नांद्रा गावातील नागरिक प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होतात,
याप्रसंगी पोलिस पाटील मनोज चांभारे पांझुर्णी,पोलिस पाटील सौ साधना संजयभाऊ कुथे नांद्रा. यांचे चांगले सहकार्य मिळाले,आणि वरोरा/माढेळी पोलिस कर्मचारी यांचेसुद्धा मार्गदर्शन व सहकार्य मिळत आहे. त्या मुळे गावात शिस्तीचे व आनंदाचे वातावरण आहे असे सरपंच सौ निर्मला सुनिल दडमल यांनी सांगितले. उपसरपंच सौ अर्चना संजयभाऊ मोडक. साहेबराव ठाकरे आणि गजाननजी काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले . अध्यक्ष मारोतराव गुडेकर यांचे विचार मंथन व धार्मिक वृत्ती महानुभव उपदेशी असल्याने त्यांचे विचार व समाज सेवा आणि तंटा निपटारी करण्याची पध्दत लोकांना पटली त्या मुळे पांझुर्णी/नांद्रा येथील लोकांना आवडते झाले.
यावेळी तंटा मुक्त कमिटी गठीत करण्यात आली. त्या मध्ये सौ.निर्मला सुनिल दडमल संरपच, सौ.अर्चनाताई संजयभाऊ मोडक उपसरपंच, साहेबराव ठाकरे ग्रामपंचायत सदस्य, व जिल्हा काँग्रेस ग्रामीण अध्यक्ष सहकारी सोसायटी अध्यक्ष गजाननजी काळे ग्रामपंचायत सदस्य सौ,आशा इंगोले ग्रामपंचायत सदस्या सौ.सुनिता उमाटे/बेलखुडे, निलेश मेश्राम ग्रामपंचायत सदस्य सौ साधना संजयभाऊ कुथे पोलिस पाटील नांद्रा. मनोज चांभारे पोलिस पाटील पांझुर्णी सुनिल ठाकरे नारायण येडमे संजयभाऊ मोडक संजयभाऊ कुथे प्रशांत हनुमंते शेखरजी मशारकर ग्रामसेवक महेशजी मोघे प्रविण पोटे: हरिदास दारुंडे मुख्याध्यापक घनश्यामजी घुगल पटवारी लाईनमेन कर्मचारी सदानंद मेश्राम तंटा मुक्त उपाध्यक्ष दिलीपराव ठाकरे दिलीपराव बेलखुडे अनिल घोडे श्रीकांत ठाकरे शेख मुस्ताफा सुनिल चांभारे पोलिस कर्मचारी ईतर गावातील नागरीक उपस्थित होते सर्वानी कमिटी चे अभिनंदन केले. गावातील तंटा गावातच सोडवण्याचा संकल्प केला.
,