लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
खिर्डी फाट्या जवळील घटना
,,,,,,,,,,,,,,,,
..
गडचांदूर,,
,,,,,,,,,,,,,,,,,
:- गडचांदूर आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास मार्गाच्या लगत उभ्या असलेल्या चारचाकी कार ने अचानक पेट घेतल्याची थरारक घटना घडली आहे सदर घटना गडचांदूर समोरील मार्गावरील खिर्डी फाट्याजवळील असून पांडुरंग थोरात असे गाडी मालकाचे नाव असून खिर्डी येथील रहिवासी असल्याची माहिती आहे
गाडी मालक असलेले पांडुरंग थोरात हे घरून आपल्या मालकीची टाटा कंपनीची इंडिका कार एम.एच.३४ ए.ए.०२८० या क्रमांकाची कार घेऊन निघाले असता खिर्डी फाट्यावर रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून आपल्या शेतात गेले काही वेळातच शेतातून परत येताना कार ने आगीचा भडका घेत गाडीतून धूर निघत असल्याचे लक्षात येता धाव घेत गाडीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला असता कार ने चांगलाच पेट घेतला होता यांनतर सदर घटनेची माहिती गडचांदूर पोलिसांना देताच गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनात पोलीसांनी अग्निशमन वाहनासोबत पोहचून आग विजवली मात्र घटनेत कार पूर्णतः जळून खाक झाल्याचे चित्र दिसत असून कुठलीही जीवित हानी झाली यावेळी ठाणेदार सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार संदीप आडकीने,पो.कर्मचारी धवणे हे उपस्थित होते आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नसून पुढील तपास गडचांदूर पोलीस करीत आहे याच मार्गावर ही दुसरी घटना असून काही महिन्यांपूर्वी चालत्या ट्रक ने पेट घेतला होता हे विशेष…
,