लोकदर्शन👉 मोहन भारती
============================
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,
-डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी काटेरी वाटा तुडवीत अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले आणि स्वतःच स्वतःच्या जीवनाचे शिल्पकार बनले.एवढेच नाही तर त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग दलित, वंचित, शोषित, महिला, बहुजन समाजाच्या उद्धारासाठी केला व भारतीय संविधानाच्या माध्यमातून सर्वांना समानतेचा अधिकार दिला. ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ठरले. विदयार्थ्यानी सुध्दा त्यांच्या कार्य विचारातून प्रेरणा घेऊन आपले जीवन घडवावे. त्यासाठी कठोर परिश्रम करण्याची व उच्च धेय्य डोळ्यासमोर ठेवण्याची गरज आहे.विद्यार्थ्यांनी आपल्या मनावर ताबा ठेऊन आपले संपूर्ण लक्ष शिक्षणावर केंद्रित करावे. ग्रामीण बहुजन विद्यार्थ्यांनी स्वतःचा मार्ग स्वतः शोधायला शिकले पाहिजे. येणारा काळ हा बहुजन विद्यार्थ्यांचाच असेलअसा प्रचंड आशावाद ब्रिटिश सरकारची चेव्हनींग ग्लोबल लिडर्स शिष्यवृत्ती मिळालेले ऍड दीपक चटप यांनी सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे ऍड दीपक चटप यांचा ब्रिटिश सरकारची चेव्हनींग ग्लोबल लिडर्स शिष्यवृत्ती मिळाल्या बद्दल तसेच भूषण थिपे यांना अमेरिकेतील ल्युसियाना युनिव्हर्सिटीची पी एच डी साठी शिष्यवृत्ती मिळाल्याबद्दल त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थाध्यक्ष डॉ आनंदरावजी अडबाले उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सत्कारमूर्तींचा आदर्श समोर ठेवून आपल्या आयुष्याला आकार द्यावा असे आवाहन त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्था उपाध्यक्ष तुळशीराम पुंजेकर, संस्था सचिव नामदेवरराव बोबडे, प्राचार्य डी आर काळे, प्रा सोज्वल ताकसांडे(विज्ञान विभाग प्रमुख),प्रा विजय मुप्पीडवार(व्यवसाय विभाग प्रमुख)तर विशेष अतिथी म्हणून शिक्षिका ज्योती चटप उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डी आर काळे यांनी, सूत्रसंचालन कला व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा प्रशांत खैरे यांनी केले तर आभार प्रा अनिल मेहरकुरे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रा रमेश सोनटक्के, प्रा दिनकर झाडे, प्रा अशोक सातारकर, प्रा नितीन सुरपाम, प्रा जयश्री ताजने, प्रा प्रवीण डफाडे,प्रा दिलीप गुजर प्रा दत्ता पोळे, प्रा भगत, प्रा गोरे, गणपत आत्राम, तसेच विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.