पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या सौजन्याने पिरकोन येथे महाआरोग्य शिबिर संपन्न.

को

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 24 ऑगस्ट
शेतकरी कामगार पक्ष व जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि ग्राम पंचायत पिरकोन यांच्या वतीने पिरकोन, उरण येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले. या शिबिरामध्ये सांधेदुःखी, दातांची तपासणी आणि डोळे तपासणी करण्यात आले. सांधेदुखी च्या रुग्णांना मोफत गोळ्या औषधे देण्यात आले तसेच डोळ्यांची तपासणी करून ज्या रुग्णांमध्ये मोतिबिंदूचे लक्षणे आढळले अशा रुग्णांवर नवीन पनवेल येथील नायर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात आले.या आरोग्य शिबिरात समृद्धी क्लीनिक, समृद्धी डेंटल केअर, नायर सुपरस्पेशालिटी आय हॉस्पिटल, नवदृष्टी सेवा संस्था, ट्रू डायग्नो यांनी नागरिकांना मोफत सेवा देऊन शिबीर यशस्वी करण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडली.

या शिबिराचे उदघाटन माजी जि. प. सदस्य जीवन गावंड, सरपंच रमाकांत जोशी, डॉ.मंदार शहा यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उदघाटन प्रसंगी पिरकोन ग्रापंचायतीचे माजी सरपंच हरेंद्र गावंड, चेअरमन अनंता गावंड, शिक्षक जगदीश गावंड, आदर्श शिक्षक विलास गावंड,सदस्य सुरेंद्र गावंड, सदस्य सुधीर गावंड व अन्य मान्यवर व गावकरी उपस्थित होते.

या शिबिरासाठी सांधे आणि हाडांच्या रोगाचे तज्ञ डॉ.मंदार शहा, दंतरोग तज्ञ डॉ.भाग्यश्री शहा, नायर आय केयर रुग्णालयाचे सर्वेसर्वा डॉ.संतोष कुमार नायर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.मनस्वी भिंगार्डे आणि टीम, ट्रू डायग्नोचे परेश पाटील, सुशांत पाटील,प्रिया पाटील, अक्षय कोळी, विक्रांत ठोकले यांनी मोफत सेवा दिली.

हे शिबीर यशस्वी करण्यासाठी जगदीश गावंड, रोहन गावंड, मनिराम गावंड, भाई पाटील,प्रमोद गावंड, आनंद जोशी, संतोष मोकल, माधव गावंड, निलेश गावंड यांनी विशेष सहकार्य केले.

कोट(चौकट ):-

ग्रामीण भागात बारमाही शेतीची कामे केली जातात. यामुळे शेतकरी बांधवांना सांधेदुखी, आणि डोळ्यांचे आजार मोठ्याप्रमाणावर पहावयास मिळतात. आरोग्य शिबीर राबवून सेवा देण्याचा प्रामाणीक प्रयत्न करीत आहे.
– प्रितम जनार्दन म्हात्रे
अध्यक्ष जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था.

कोट(चौकट ):-

प्रितम म्हात्रे यांनी आमच्या गावातील ग्रामस्थांना मोफत आरोग्य शिबीर राबवून आणि मोतीबिंदुच्या शस्त्रक्रिया मोफत करून दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करतो.
– रमाकांत कृष्णा जोशी
सरपंच ग्रामपंचायत पिरकोन

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *