लोकदर्शन👉 मोहन भारती
चंद्रपुर:-
बल्लारपुर नजीक जुना पावर हाऊस परिसरात मागील महिन्या भरापासून बिबट्याचा वावर वाढला होता.विसापुर गावातील व रस्त्यावरील पशुधन फस्त करित हौता त्यामूळे विसापुर ची जनता भयभित झाली होती.काल सायंकाळी गावात येवुन एका बकरी च्या गोठ्यात जावुन बकरी मारली.या घटनेची माहिती मिळताच तात्काळ वनविभागाच्या अधिका-यानी घटना स्थळी येवुन पहाणी करित घटनेचा पंचनामा केला. आज जुना पावर हाऊस परिसरात व बाॅटनिकल गार्डन परिसरात या दोन्ही ठिकाणी पिंजरा लावण्यात आला आहे.
जुना पावर हाऊस येथिल परिसरात बिबट्याची दहशत मागिल महिन्या भरा पासुन वाढली होती.या परिसरात बल्लारपुर पेपर मिल ला जाणारे कर्मचारी,मजुर वर्ग,शाळेत जाणारे विद्यार्थी,लागूनच असलेल्या बलारपुर तालुका क्रिडा संकुलात येणारे क्रिडा प्रेमी,सकाळी मार्निंग वाॅक करिता येणारे वृध्द,तरुण तरुणी,लागलेले असलेले बाॅटनिकल गार्डन,तसेच जुना पावर हाऊस येथे १९५७ साला पासुन सुरु असलेली एक ते पाच वर्गाच्या शाळेत येणारी लहान मुले व तेथील दोन शिक्षिका व पशूधन रखवालदार आपले पशुधन चराई करिता आणत आसतात त्या मुळे या सा-याची मोठी ये जा या परिसारातून होत असते त्यामूळे या सा-यांचा जिव टांगणीला लागला होता .मागिल पंधरा दिवसात बक-या,कुत्रे,वासरू मारले,तो बिबट्या इथेच थांबला नाही तर विसापुर गावात जावुन कुत्रे,बक-या,मारु लागल्याने विसापुर वासीय व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी,विविध राजकिय पक्षाचे पदाधिकारी यांनी बिबट्याला पकडण्याची मागणी वनविभागाला तोंडी,व पत्रा द्वारे केली. बिबटाच्या वाढत्या घटनेची माहिती मिळताच बल्लारपुर चे वनपरीक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे,यांनी तात्काळ दखल घेवुन परिसरात मागिल पंधरा दिवसा पासुन जनतेच्या संरक्षणाच्या सुरक्षते करिता रात्र दिवस पहारे करांची ड्यूटी लावली.आज बाॅटनिकल गार्डन जवळ व जुना पावर हाऊस रस्त्यावर असे सुसज्ज दोन पिंजरे ठेवण्यात आले आहे. या करीता वनपरीक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्र सहायक अधिकारी कोमल गूगलोत,वनरक्षक अमित चहांदे ,कर्मचारी विपुल गौरकार,चेतन भोयर,व अन्य कर्मचारी या कार्यात लक्ष देवुन आहेत आता बिबट्या पिंज-या येते किंवा नाही या कडे सर्व विसापुर वासियाचे लक्ष लागले आहे.