लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 22 ऑगस्ट ला महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे पाक कला स्पर्धेचे आयोजन प्राचार्या स्मिताताई चिताडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले . या स्पर्धेचे उद्घाटन गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर चे प्रभारी सचिव श्री धनंजय गोरे व उपमुख्याध्यापक अनिल काकडे यांच्या हस्ते करण्यात आले ,प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य विजय आकनूरवार,पर्यवेक्षक एच बी मस्की,एम सी व्ही सी विभागाचे प्रमुख प्रा अशोक डोईफोडे, होते.या स्पर्धेत विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला, विविध प्रकारचे चमचमीत खाद्य पदार्थ तयार करून स्टॉल लावले होते, विविध प्रकारच्या खाद्य पदार्थ चा आस्वाद शिक्षक व विद्यार्थ्यांनी घेतला.ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. संगीता गिरी मॅडम ,प्रा माधुरी पेटकर ,लता देशमुख, माधुरी मस्की, श्वेतलाना टिपले,किरण पोगुलवार,अमोल शेळके,मारोती आगलावे,यांनी सहकार्य केले या स्पर्धेचे परीक्षण प्रा प्रगती आगे ,प्रा चेतना कामडी, जुबेदा मॅडम,स्वाती केळकर ,यांनी केले या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग दर्शविला यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या महाराष्ट्रीयन खाद्य पदार्थांचा समावेश केला होता.
,