लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे
उरण दि २२ ऑगस्ट बेथेल चॅरिटेबल ट्रस्टने कोणावरही अन्याय केला नाही.बेथेल चॅरिटेबल ट्रस्टच्या बाबतीत चुकीची माहिती पसरविली जात आहे. सदर ट्रस्ट वर केलेले आरोप तथ्यहिन, बिन बुडाचे आहेत.ट्रस्टने कोणावरही अन्याय केला नाही असा खुलासा आर्क फॉउंडेशन या संस्थेचे अध्यक्ष बबन कांबळे यांनी पत्रकार परिषदेतून केला.
सिवूड नवी मुंबई येथील बेथेल चॅरिटेबल ट्रस्ट संदर्भात माहिती देण्यासाठी आर्क फॉउंडेशनच्या माध्यमातून दिनांक २१/८/२०२२ रोजी दुपारी ४ वाजता होप बॅंकवेट हॉल, जुईनगर रेल्वे स्टेशन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बबन कांबळे यांनी अनेक गोष्टी व घटना वर खुलासा केला. व काही प्रकरणा विषयी माहिती दिली.यावेळी फादर राजकुमार येसूदासन यांच्या पत्नी जिना राजकुमार येसूदासान, ऍडव्होकेट अनिल बुगडे, शांती सुशील गुप्ता यांची मुलगी सुजाता सुशील गुप्ता, सुजाताची आई शांती सुशील गुप्ता आदी मान्यवर पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
सीवूड, नवी मुंबई येथे बेथेल चॅरिटेबल ट्रस्ट नावाची संस्था आहे. या संस्थेमध्ये गरीब अनाथ मुलांना तसेच वयोवृद्ध अनाथ लोकांचे सांभाळ करीत असतात. सदर ट्रस्ट फादर राजकुमार येसुदासन हे चालवीत असतात. अनेक वर्षापासून याठिकाणी गरीब व अनाथ मुलांचे शिक्षण, औषधोपचार व त्यांच्या राहण्याची, खाण्यापिण्याची व्यवस्थित सोय केली जाते. या संस्थेमध्ये नवी मुंबईचे पोलीस व इतर सामाजिक संस्था आजूबाजूचे परिसरातील अनाथ लोकांना इथे आणून सोडत असतात. सदर आश्रम बाबत खोटी बातमी पसरविण्यात आली कि, इथे दुर्गंधी आहे, मुलांचे लैंगिक शोषण होते. दिनांक ०५ ऑगस्ट, २०२२ रोजी सी.डब्ल्यु.सी, ठाणे यांनी येथील ४५ मुलांना कोणतीही नोटीस न देता स्वतःच्या ताब्यात घेतले व उल्हासनगर येथील सी.डब्ल्यु.सी. सेंटर मध्ये ठेवले. त्यानंतर ११ मुले स्वतःच्या ताब्यात ठेवून बाकीच्या मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. दरम्यान शांती सुशील गुप्ता यांची मुलगी सुजाता सुशील गुप्ता, वय वर्षे १४ हिचा फादर राजकुमार येसुदासन याने विनयभंग केला अशी खोटी तक्रार एन.आर.आय. पोलीस स्टेशन, नवी मुंबई येथे केली.व त्या तक्रारी अनुसार फादर राजकुमार येसुदासन यांना POSCO अंतर्गत अटक करण्यात आली व काही दिवस त्यांना मा. ठाणे जिल्हा न्यायालयाने पोलीस कोठडी दिली. व आता सद्या ते ठाणे येथील कारागृहात आहेत. सदर मुलीची आई शांती सुशील गुप्ता हिच्या म्हणण्यानुसार तिच्या मुलीवर कोणत्याही प्रकारचा अनैतिक किंवा विनयभंगाचा प्रकार या संस्थेमध्ये झालाच नाही. या मुलीची मेडिकल दिनांक १३ ऑगस्ट, २०२२ रोजी झाली आहे व मेडिकल करण्या आधीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे चुकीचे आहे. सद्या ११ मुले सी.डब्ल्यु.सी उल्हासनगर यांच्या ताब्यात आहेत. व त्यांच्या पालकांनी मागणी करून देखील सदर मुले पालाकांच्या स्वाधीन सी.डब्ल्यु.सी. करीत नाही. पालकांनी मागणी केली असता त्यांना उद्धट उत्तरे दिली जातात. शांती सुशील गुप्ता व सुजाता सुशील गुप्ता यांनी सदरच्या खोट्या तक्रारीबाबत शपथपत्र तयार केले आहे व ते दिनांक २२ ऑगस्ट, २०२२ रोजी मा. ठाणे जिल्हा न्यायालय येथे सादर करणार आहेत. एकंदरित सदर संस्थेमध्ये कोणत्याही मुलावर कोणत्याही प्रकारे लैंगिक अत्याचार झालेला नाही व काही वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्या ह्या चुकीच्या आहेत. प्रामुखाने गर्भपात केल्याची बातमी पूर्णपणे चुकीची आहे. सदर संस्थेवर अलीकडे रात्री अपरात्री काही लोक येऊन आरडाओरड करत असतात. व गेट ठोकून खोला असे बोलत असतात. हे गैरकानुनी आहे.याबाबत अल्पसंख्यांक आयोगाकडेही दाद मागणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत बबन कांबळे यांनी दिली.यावेळी नवी मुंबई मधील अनेक पत्रकार उपस्थित होते.