लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
:- भारत देश हा युवकांचा देश म्हणून ओळखल्या जातो. युवकांनी समजाच काही देणं लागते या उद्देशाने समाजात सक्रीय राहून समाजकार्य केले पाहिजे. त्याच प्रमाणे रक्तदान सुध्दा काळाजी गरज आहे. आजही रक्तदान करण्यास अनेक युवक पुढे धजावत नाही. त्यामुळे रक्तदान शिबिरात युवकांनी हिरहिरीने सहभाग घेऊन रक्तदान करण्यास पुढे आले पाहिजे. रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान समजल्या जाते. रक्तदानाने अनेकांचे प्राण वाचतात याची प्रचिती कोरोणा काळात देखील आली त्यामुळे युवकांनी रक्तदानास पाहिले प्राधान्य दिले पाहिजे. असे प्रतिपादन नांदा फाटा येथील स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात त्यांनी व्यक्त केले.
प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच शामसुंदर राऊत, माजी जिल्हा परीषद सदस्य शिवचंद्र काळे, माजी उपसपंच पुरुषोत्तम आस्वले, शिवाजी इंग्लिश स्कूल मुख्याध्यापिका अलेकझांडर डीसुजा, चांगदेव बोडखे, नामदेवराव पाचभाई, डॉ राहुल लांडे, डॉ राहुल भोयर, बापुराव बोनगिनवार, ठनुजी पाचभाई, गौतम धोटे, कनिक्ष ताकसांडे, उपस्थित होते.
उपस्थित सर्व मान्यवरांचे सन्मान चिन्ह शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. अनेक वर्षापासून कावीळ चे आयुर्वेदिक औषध देत असलेले चांगदेव बोडखे, यांचा सत्कार करण्यात आला. कोरोना काळात उल्लेखनीय काम करणाऱ्या डॉ.बाळा चौधरी,डॉ स्वप्नेश चांदेकर, डॉ सुशील चंदनखेडे, डॉ राहुल लांडे तसेच इतर डॉक्टर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ३७ वेळा रक्तदान करणारे सुजित ठाकूर व रक्तदान कार्यात उल्लेखनीय काम करून २५ पेक्षा जास्त वेळ रक्तदान करणारे सतीश जमदाडे यांचा देखील या वेळेस सत्कार करण्यात आला. जिल्हा स्तरीय श्रमिक पत्रकार संघाचा ग्रामीण वार्ता पुरस्कार प्राप्त दैनिक देशोन्नती चे तालुका प्रतिनिधी गणेश लोंढे, ग्रामदुत फाऊंडेशन चे अध्यक्ष, शिवजी इंग्लिश स्कूल चे उपमुख्याध्यापक रत्नाकर चटप, व दैनिक भास्कर चे प्रतिनिधी रवी बंडीवार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
सदर शिबिरा ला युवकांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवित ६५ रक्तदात्यानी रक्तदान केले. मोठ्या प्राणावर युवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रत्नाकर चटप यांनी केले तर आभार सतीश जमदाडे यांनी मानले. कार्यक्रमाचा यशस्वीेतेसाठी आकाश बोनगिनवाऱ, चंद्रशेखर राऊत, आकाश किरमीरवार, जावेद सिद्दिकी, व युवा मित्रपरिवार नादा फाटा यांनी अथक परिश्रम घेतले.