युवक मित्र संस्थेचा उपक्रम, हिंगोणेसीम ते जळोद पायपीट वाचणार! प्रवीण महाजन यांचे मोलाचे कार्य

 

लोकदर्शन👉 राहुल खरात

पुणे; युवकमित्र संस्थेने हिंगोणेसिम येथून शाळेसाठी जळोद येथे तीन किमी पायी चालत येणाऱ्या २२ विद्यार्थ्यांची पायपीट वाचवली आहे. पुणे, मुंबई शहरातील नागरिकांनी दान केलेल्या जुन्या सायकली दुरुस्त २२ विद्यार्थ्यांना मोफत सायकलीचे वाटप करण्यात आले.

यावेळी सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे, उपाध्यक्ष सतीलाल भोई, मुख्याध्यापिका सुरेखा देसले, भारतीय सरपंच भारती साळंके, हिंगोणेसिमचे

गरजू शाळांना आवाहन

ग्रामीण भागातील गावापासून तीन किमीपेक्षा अधिक अंतर असणाऱ्या व बससुविधा नसणाऱ्या माध्यमिक शाळांनी सायकल मागणी अर्ज पाठवण्याचे आवाहन सायकल बँक उपक्रमाचे प्रमुख प्रवीण महाजन यांनी केले आहे.

उपसरपंच शालीक कोळी उपस्थित होते. यामुळे विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार असून, शाळेत नियमित उपस्थित राहण्यास व अध्ययन करण्यास मदत होणार आहे.

परिवार संस्थेतर्फे सायकल बँक’ उपक्रम राबविण्यात येत आहे.

हिंगोणेसिम येथून जळोद शाळेत पायी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळेचे शिक्षक ज्ञानेश्वर कुवर यांनी सायकलीची मागणी केली होती. त्यानुसार युवकमित्र संस्थेचे प्रमुख प्रवीण महाजन यांनी मोफत सायकल उपलब्ध करून दिल्या. सायकल दुरुस्तीसाठी स्थानिक गावकऱ्यांचे सहकार्य लाभले, आभार मुख्याध्यापिका सुरेखा देसले यांनी मानले. उपक्रम यशस्वीतेसाठी युवकमित्र संस्थेचे आकाश भोई, भूषण देसले यांचे सहकार्य लाभले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *