लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर
लोका सांगे ब्रह्म ज्ञान स्वतः असे कोरडे पाषाण- भाजपा नेते विनोद उन चौधरी यांचे टीकास्त्र
घुग्घुस येथील राष्ट्रवादीचे नेते सुरेश पाईकराव हे बीआरएसपी तून हकालपट्टी झालेले व सुब्बई येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून पैसे उकडण्याच्या प्रकरणातील वादग्रस्त नेते आहे. लोका सांगे ब्रह्म ज्ञान स्वतः असे कोरडे पाषाण असे टीकास्त्र भाजपा नेते विनोद चौधरी यांनी सोडले आहे.
सुरेश पाईकराव हे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीत असतांना त्यांच्या नेतृत्वात सुब्बई येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यासाठी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात त्यांनी लोकांचा उपयोग करून घेत पैशे उकडण्याचे काम केले. स्वतःच्या स्वार्थासाठी आंदोलन करून चमकोगिरी केली होती त्यामुळे या आंदोलनास यश आले नाही. प्रसारमाध्यमात वृत्तप्रकाशित झाल्याने सुरेश पाईकराव यांना मोठया बदनामीचा सामना करावा लागला होता. त्यानंतर सुब्बई येथील अनेक शेतकऱ्यांनी घुग्घुस येथे येऊन पोलीस ठाण्यासमोर सुरेश पाईकराव यांच्या निषेध केला व निवेदन दिले आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
बदनामीचा मार सोसत असतांना सुरेश पाईकराव यांची बीआरएसपी तून हकालपट्टी करण्यात आली होती. सफेद झेंडा कामगार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी एसीसी कंपनीविरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनालाही मारापिटीचे ग्रहणलागले व सुरेश पाईकराव यांच्या समर्थकांवर गुन्हे दाखल झाले होते व या ही आंदोलनास यश आले नाही. त्यांनी केलेल्या आंदोलनास यश न आल्याने त्यांची अपयशी नेते म्हणून ओळख निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादीचे नेते सुरेश पाईकराव यांनी भाजपा नेत्यांनी घुग्घुसच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप प्रसारमाध्यमातून केला. या आरोपांवर भाजपा नेते विनोद चौधरी यांनी टीकास्त्र सोडले आहे. मागील अडीच वर्ष राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता होती तेव्हा मात्र सुरेश पाईकराव झोपी गेलेले होते राष्ट्रवादीची सत्ता जाताच ते झोपेतून खळबडून जागे झाले आणि निराधार आरोप भाजपा नेत्यांवर केले आहे.
ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी खासदार हंसराज अहिर, माजी आमदार नानाभाऊ शामकुळे व माजी जिल्हापरिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या माध्यमातून घुग्घुस शहरातील ग्रामीण रुग्णालय,नवीन बसस्थानक, वर्धा नदीवरील पूलाचे काम, तीन पाण्याची टाकी, अनेक आरो मशीन, रस्त्यावरील विजेच्या प्रत्येक खांबावर एलईडी लाईट, हायमास्ट लाईट, शहरातील प्रत्येक सिमेंट काॅक्रिट रस्ते, नाली बांधकाम, विविध ठिकाणी बगीचे, सर्व धर्मिय स्मशानभूमीचा विकास, शाळा, अंगणवाडी इमारत व पशुवैद्यकीय दवाखाना असे अनेक विकासाची कामे भाजपाने केली. परंतु राष्ट्रवादीची सत्ता असतांना घुग्घुस शहरात एक नाली सुद्धा बांधली नाही. राष्ट्रवादीची सत्ता अडीच वर्ष असतांना सुरेश पाईकराव यांनी घुग्घुस शहरात विकासाचे एकही काम केले नाही.
यासोबतच नगर परिषद निर्मितीच्या आंदोलनादरम्यान जि.प. महिला व बालकल्याण सभापती नितुताई चौधरी व पं. स. उपसभापती निरीक्षण तांड्रा हे विद्यमान पदावर विराजमान असतांना त्यांनी घुग्घुस नगर परिषदेच्या निर्मितीसाठी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे नगर परिषद होऊ शकली तसेच नगर परिषदेच्या सर्व पक्षीय आंदोलनात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचे नेतृत्व होते हे सुद्धा सुरेश पाईकराव यांनी विसरू नये.