लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे
उरण दि 21ऑगस्ट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राज साहेब ठाकरे यांच्या स्वाक्षरीने उरण मनसेच्या तालुका अध्यक्षपदी सत्यवान भगत ,उरण तालुका सचिव पदी अल्पेश कडू, उरण शहर अध्यक्षपदी धनंजय भोरे , द्रोणागिरी शहर अध्यक्ष पदी रितेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे.नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
उरण तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आक्रमक असणारे , जनतेचे प्रश्न सार्वजनिक बांधकाम खात्याचे खड्डेमय रस्ते , महावीतरणाचा भोंगळ कारभार , सिडको , वाहतूक कोंडी ह्या समस्या बाबत नेहमी आवाज उठवणारे आणि आदिवासी बांधवाना, गरजू विद्यार्थी यांना सतत मदत करणारे सत्यवान भगत यांची तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. तर मनसेच्या प्रत्येक कार्यक्रमात हिरीरीने भाग घेणारे मनसेच्या प्रत्येक संप आंदोलनात सहभाग घेणारे, पक्षाचा तळागाळात प्रचार प्रसार करणारे म्हणून ज्यांची ओळख आहे अशा कार्यकर्त्याची नवीन पदावर नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये उरण तालुका सचिव अल्पेश कडू,शहर अध्यक्षपदी धनंजय भोरे, द्रोणागिरी शहर अध्यक्ष पदी रितेश पाटील यांची निवड करण्यात आली असून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शर्मिलाताई ठाकरे यांच्या हस्ते अधिकृत नियुक्ती पत्र ही देण्यात आली आहेत. मनसे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष सत्यवान भगत, उरण तालुका सचिव अल्पेश कडू, उरण शहर अध्यक्ष धनंजय भोरे, द्रोणागिरी शहर अध्यक्ष रितेश पाटील यांच्यावर विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.