गडचांदूर नगर पालिकेत वॉर्ड नं ६ टीचर कॉलणी येतेय ना!

लोकदर्शन, जि. चंद्रपूर 👉
(अशोककुमार भगत)

गडचांदूरातील विविध वॉर्डात सध्या रोड आणि नाली बांधकामाची अनेक कामे युद्ध स्तरावर सुरू असल्याचे आढळते. मात्र, वॉर्ड नं ६ येथील टीचर कॉलनी ह्याला अपवाद असल्याने हा भाग नगरपालिकेत येतेय ना? असा संभ्रमावस्थेचा प्रश्न उभा ठाकला आहे.

मुळात, दोन सदशीय या वार्डात काँग्रेस आणि भाजप चा प्रत्येकी एक सदस्य निवडून आला. यातही, भाजप चा निवडून आलेला सदस्य हा चाणाक्ष नि कार्यकुशल असल्याने या वॉर्डातील विकासकामे अडवून त्यांना तोंडघशी कसे पाडता येईल, याकडेच सत्ताधाऱ्यांचा रोख असल्याची बाब निदर्शनास आली आहे.

गडचांदूर नगर पालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी युतीची एकहाती सत्ता आहे. आमदारही काँग्रेस युतीचेच आहेत. असे असतांना वॉर्डा-वॉर्डातील विकासकामात असा दुजाभाव कसा?
याच वॉर्डातील हिरो शोरुम समोरील खुल्या प्रांगणावर (ओपन स्पेस) अंगणवाडी क्र. १६ कार्यरत आहे. हे प्रांगण अक्षरशः घाणीच्या विळख्यात अडकल्याचे दिसते. अंगणवाडीच्या दूतरफा नाली बांधकाम करण्याचा विसरही पालिका शासन-प्रशासनाला पडला. परिणामी, अंगणवाडीची मागील इमारत भिंत चक्क ४ फूट पाण्यात उभी आहे.

या प्रदूषित पाण्यामुळे विविध रोगराई उदभऊ शकते. या अंगणवाडीतून शेकडो बालकांचे लसीकरण केले जाते. तसेच दैनंदिन पोषण आहारही वितरित केला जातो. पालिका प्रशासनाला हे सारे माहीत असतांनाही, याकडे होणारे कमालीचे दुर्लक्ष येथील विरोधी नगरसेवकामुळेच असावे, असा संशय आता वॉर्डवासीयांचा बळावला आहे.

या संदर्भात नगर पालिकेतील काँग्रेस चे गटनेते विक्रम येरणे यांच्या कानावर दुतर्फा नाली बांधकामाची ही मूलभूत समस्या सदर पत्रकारांनी टाकली. मात्र, अद्यापही ही समस्या दूर झाली नाही. नव्याने विकसित झालेल्या या वॉर्डातील इमारती बांधकामाची विधिवत मंजुरी घेणे, त्यासाठी शासकीय शुल्क भरणे, नियमित कर भरणा सुरू असतांनाही पालिका मूलभूत सोयी-सुविधा पुरवत नसल्याची वॉर्डवासीयांची शोकांतिका आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *