स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती व स्व. हरिभाऊ डोहे गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन सोहळा

 

लोकदर्शन👉 मोहन भारती

सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव स्व. डोहे गुरूजी यांच्या 29 व्या पुण्यतथीनिमित्त व स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 78 जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन सोहळ्याचे आयोजन सावित्रीबाई फुले विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर, शरदराव पवार कला वाणिज्य महाविद्यालय गडचांदूर, सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल गडचांदूर ,संजय गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय पेल्लोरा, स्वर्गीय डोहे गुरुजी माध्यमिक विद्यालय कोरपना यांच्या संयुक्त विद्यमाने शरदराव पवार कला वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात आज दिनांक 20 ऑगस्ट 2022 ला आयोजित करण्यात आला .
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. आनंदराव शं.अडबाले होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सर्व शिक्षकांनी अधिक परिश्रम घेण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष तु.ता.पुंजेकर, संस्थेचे सचिव नामदेवरावजी बोबडे ,संस्थेचे सदस्य नो. शां. मंगरूळकर , सदस्य मा.ना.मंदे संचालिका श्रीमती नलिनी डोहे , संचालिका श्रीमती उज्वला चांदेकर, प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह ,प्राचार्य तथा मुख्याध्यापक धर्मराज काळे, बी. एस.उलमाले, विनोद हेपट, प्रभारी प्राचार्या ईटनकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक मोहरे सर, माजी प्राचार्य संजय ठावरी कोरपना , सेवानिवृत्त प्रा. करमनकर व प्रा.प्रदीप बोबडे , गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव बाबा पाटील गोरे , अनील निवलकर, इत्यादी मंडळी विचार मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख अतिथिंनी स्व. हरिभाऊ डोहे गुरुजी तसेच स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जीवन
कार्यावर सखोल मार्गदर्शन करून त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन सर्वांनी समाजकार्य करावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावित्रीबाई फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मराज काळे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रशांत खैरे कला विभाग प्रमुख यांनी केले तर पाहुण्यांचे आभार महेंद्रकुमार ताकसांडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेअंतर्गत संचालित सर्व शाळा कनिष्ठ महाविद्यालय तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक , शिक्षक ,शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित,राहून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *