अंबुजा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव रॅली काढून उत्साहात साजरा.

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा
अमृतमहोत्सव
अंबुजा सिमेंट फौंडेशन तथा अंबुजा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या महोत्सव ची सुरवात दिनांक १३ ऑगस्टला सकाळी ९ वाजता संस्थेचे प्रोग्राम मॅनेजर श्री श्रीकांत कुंभारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात अली. या ध्वजारोहण कार्यक्रमाला प्रमुख अतिथी श्री अरविंद चौधरी , श्री जितेंद्र बैस, श्री नरेश सुभे, श्री रवी मडावी, श्री संदीप तोडे व श्री श्रीनिवास पोतर्ला उपस्थित होते. याप्रसंगी अंबुजा सिमेंट फौंडेशन कार्यालय परिसर, ट्रान्सपोर्ट नगर व हरदोना येथून देशभक्तीपर संदेश देणारी आकर्षक रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये आकर्षक रथ सजावट, विविध थोर पुरुषाची वेशभूषा धारण केलेले विध्यार्थी, देशभक्ती गीतावरील नृत्य आणि देशभक्ती गीत गायन करून विध्यार्थ्यानी परिसरातील नागरिकांना मंत्रमुग्ध केले. रॅलीमध्ये सर्व विध्यार्थ्यांच्या हाती असलेल्या तिरंग्या झेंड्यामुळे व दिलेल्या नाऱ्यांच्या घोषणांनी विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह निर्माण झाला होता. या रॅलीचे उदघाटन श्री श्रीकांत कुंभारे यांनी हिरवी झेंडी दाखवून केले व समारोप हरदोना ग्रामपंचायतच्या पटांगणावर उपसरपंच श्री रामचंद्र सूर तसेच हरदोना येथील प्रतिष्टीत नागरिक श्री वासुदेव झाडे पाटील, समस्त महिला वर्ग, युवा वर्ग, लहान मुले व समस्त हरदोनावासी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी असिफाचे श्री जितेंद्र बैस यांनी कार्यक्रमाचे महत्व आणि उद्देश याविषयी माहिती सादर केली तर माननीय उपसरपंच श्री सुर

यांनी रॅलीचे स्वागत व प्रशंसा करून आपले विचार व्यक्त केले व सर्वाना शुभेच्या देऊन कार्यक्रमाचा समारोप केला. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आणि व्यवस्थापन अंबुजा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे माननीय प्राचार्य श्री प्रमोद खडसे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन श्री धर्मेंद्र बेलोरकर यांनी केले. रॅलीमध्ये वेशभूषा, नृत्य आणि गायन सौ. प्रियंका बलकी व प्रांजु गौरकार यांनी बसविले. अल्पोहार व्यवस्था श्री तेजराज हेपट, रथ सजावट श्री पावन थिपे, श्री सुजित मुडपल्लीवार व श्री सुकेश बिश्वास यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री प्रफुल बोरकुटे, प्रतीक आवाडे , अमित चौधरी व सर्व विध्यार्थी मित्र व अंबुजा सिमेंट फौंडेशनचे सर्व कर्मचारी यांनी सहकार्य केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *