लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर – आवाळपूर – वनोजा राज्य महामार्गावर लाल मातीची चादर,
रस्त्यावर धुळीचे साम्राज्य.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
आवाळपूर – नांदा परिसर हा औद्योगीक क्षेत्र म्हणून ओळखल्या जाते.विविध कारणाने नेहमी प्रचलीत सुध्दा असते. परंतू आता येथील मुख्य मार्ग राज्य महामार्ग हा लाल मातीने माखला असून नागरिकांचा चर्चेचा विषय ठरला असल्याने हा राज्य महामार्ग होय असे की शेतात जाणारा पांदन रस्ता अशी रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे.
, नांदा – आवाळपूर परीसर औद्योगीक नगरी म्हणून प्रकाश झोतात आला आहेत, परिसरात सिमेंट कंपन्या असल्याने कंपनीचा कच्चा माल ने आन व सिमेंट भरलेले कॅप्सुल ट्रक येथील रस्त्या वरून जात असल्याने नेहमीचीच वर्दळ असते.
सिमेंट उद्योगाला लागणारी लाल माती व माणिकगड माईन्स मधील लाइमस्टोन मोठ मोठ्या हायवाने आणला जातो ओव्हरलोड व टारपोलीन बांधली नसते मागच्या पल्ल्यातून लालमाती व लाईमस्टोन दररोज मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पडतो आवाळपूर ते बिबी गावा पर्यंत संपुर्ण रस्ता हा लाल मातीने माखलेला दिसून येत आहे.एकीकडे सिमेंट कंपनीत चकाचक रस्ते तर दुसरीकडे सिमेंट उद्योगाला लागणारा कच्चामालाच्या वाहतुकीमुळे नांदाफाटा येथील नागरिकांना धुळीचा प्रचंड त्रास होत आहे गडचांदूर वणी राज्य महामार्ग की पांदण रस्ता नागरिकामध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
सिमेंट कंपन्या असल्याने हा मार्ग नेहमीचाच वर्दळीचा असतो त्यामुळे धुळीचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर असते. परंतू आता मात्र त्यात अधिकची भर पडली असून रस्ता तर लाल दिसतच आहे मात्र रस्त्यावरील धूळ उडत असल्याने येथील नागरिकांना लाल धूळीचा सामना करावा लागत आहे. एवढेच नाही तर रस्त्यावरील दुकानात लाल धुळीचा थर साचात असल्याने दुकानदार त्रस्त झाले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
औद्योगीक परीसर आल्याने या मार्गावर सततची दरवळ असते. सिमेंट कंपन्याचे मोठ मोठे ट्रक या मार्गावर चालतात. त्यामुळे रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहे. त्यात कुठे गीट्टी तर कुठे मातीचा थर टाकण्यात आला असल्याने त्याचा नाहक त्रास नागरीकांना सहन करावा लागत आहे. तोच आता रस्त्यावरील लाल मातीचा धूळ सुध्दा नागरीकांना खावा लागत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग किती कार्यशिल आहे यावरून दिसून येत आहे.
परीसरात दिवसा गणीक धुळीचे साम्राज्य वाढतच असल्याने याचा विपरीत परिणाम नागरिकांचा आरोग्यावर होत असून अनेक गंभीर आजाराला समोर जावे लागत आहे.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजवण्यासाठी टाकलेल्या मातीमुळे नागरिकांची आरोग्य धोक्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने नांदाफाटा बाजारपेठेतील रस्त्यावरील खड्ड्यातील माती व लाल माती हटवून डांबरीकरणाने खड्डे बुजवून दुरूस्ती करावी अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरुन आंदोलन करावे लागेल.
:- महेश राऊत दुकानदार नांदा
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
,