लोकदर्शन 👉 मोहन भारती
कोरपना – कोणत्याही क्षेत्रात यश प्राप्त करायचे असल्यास ध्येय निश्चित करून त्या दृष्टीने वाटचाल केली पाहिजे. असे प्रतिपादन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ,राजुराचे उपाध्यक्ष श्रीधरराव गोडे यांनी कोरपना येथे प्रभाकरराव मामुलकर महाविद्यालय तर्फे आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी व्यक्त केले.
ब्रिटिश सरकारची चेव्हनिंग स्कॉलरशिप प्राप्त केलेल्या अॅड. दीपक चटप व नायब तहसीलदार पदी वर्णी लागलेल्या मा.श्री.गिरीश बोरडे यांचा सत्कार करण्याकरीता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष सन्मा.श्रीधररावजी गोडे तसेच कोरपना पंचायत समितीचे माजी सदस्य रमाकांत मालेकर, प्रभाकरराव मामुलकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. सी. जोसेफ यांच्या हस्ते सत्कारमूर्ती अॅड.दिपक चटप व मा.श्री प्रतीक बोर्डे यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना तरूणांनी आपली तरुणाई सामाजिक हितासाठी व समाजाचे ञॄण फेडण्यासाठी खर्च करावी. असा मोलाचा संदेश चटप आणि बोरडे या सत्कार मुर्तींनी विद्यार्थ्यांना दिला. तसेच यावेळी महाराष्ट्र शासनाच्या आजादिका अमृत महोत्सवप्रसंगी स्वराज्य महोत्सवा अंतर्गत सामूहिक राष्ट्रगीत गायन व महाविद्यालय परिसरात वृक्षारोपणकार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन प्रा डॉ विशाल मालेकर , आभार प्रा. राजेंद्र देवाळकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभाकरराव मामुलकर महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी वृद् यांनी सहकार्य केले.