लोकदर्शन👉 मोहन भारती
*सोलापूर दिनांक :- १७/०८/२०२२ :-* श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल) मध्ये पार्किंगच्या नावाखाली लाखो रुपयांचा चोरी झालेली आहे. सदर चोरी कोणी केली, कसे केले याचा मुख्य सुत्रधार कोण याची संपुर्ण चौकशी करून चोरट्यांवर कारवाई करा. अशा माणीचे निवेदनाव्दारे शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय व डॉ. वैशंपाय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता यांच्याकडे केली. अन्यथा शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी दिला आहे.
अधिष्ठता यांना दिलेल्या निवेदनात श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालय सोलापूर (सिव्हिल हॉस्पिटल) मधील आवारात गेल्या अनेक वर्षापासून बेकायदेशीर दुचाकी वाहनांची पार्किंग (वाहनतळ) होते. या पार्किंगमध्ये गाडी ठेवणाऱ्या लोकांकडून प्रत्येक वाहनाला १० रु. घेतला जात होता. आणि त्याची रितसर पावती देखील देण्यात येत होते. असे बेकायदेशीर पार्किंग अंदाजे ५ ते ६ वाहनतळ आहेत. सुमारे १० वर्षापूर्वी पासून हे वाहनतळ चालविले जात होते. पण याबाबत कोणीही लक्ष दिला नाही. विशेष म्हणजे सिव्हिल प्रशासनाचे प्रमुख म्हणून आपण याकडे लक्ष देण्याचे गरज होते. पण तसा झालेला दिसून येत नाही.
सदर बेकायदेशीर वाहनतळे १० वर्षापासून असल्याने एका वाहनतळावर दररोज कमीत कमी ५०० ते १००० वाहने पार्किंग करतात. म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलमधील सर्व वाहनतळावर अंदाजे ३ ते ४ हजार वाहन पार्किंग केले जातात. आणि प्रत्येकी १० रुपयेप्रमाणे दररोज ३० ते ४० हजार रुपयांचा पार्किंग फी जमा होतो. अशाप्रकारे कोट्यावधी रुपायांचा भ्रष्टाचार या बेकायदेशीर वाहनतळाव्दारे झालेले दिसून येते. नेमके हे बेकायदेशीर वाहनतळ कोणाचे आहेत. कोणाच्या परवानगीने चालत होते. त्यांनी देत असलेल्या पावत्या कोणाच्या आधारावर देत होते. त्या पावत्यावर असलेला शासकीय मुद्रा कोणाच्या ओदशाने वापरण्यात आला. प्रत्येक वाहनतळावर त्यांचे साक्षीदार राहत होते. त्यांची नेमणुक कोणी केली. आणि वाहनतळ मालकाला कोणाचा चुपा पाठिंबा होता. असे अनेक प्रश्न या बेकायदेशीर वाहनतळामुळे उपस्थित
होते आहेत. या संपुर्ण बेकायदेशीर वाहनतळामुळे झालेला कोट्यावधी रुपयांचा घोटाळ्याला कोण जबाबदार. कारण या वाहनतळावर गोरगरीब रुग्णांची, रुग्ण नातेवाईकांची व सोलापूर जनतेची लुट झालेली आहे. हे अत्यंत गंभीर बाब आहे. आणि या हॉस्पिटलचे अधिक्षक म्हणून आपल्यावर याची जबाबदारी येऊन टेपली आहे.
तरी माननीयांनी श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठता या नात्याने वरील विषयावर चौकशी करून संबंधींतावर कारवाई करण्यात यावे. ही नम्र विनंती. असे नमुद करण्यात आले. असे नमुद करण्यात आले.
सदर प्रसंगी विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात विठ्ठल कुऱ्हाडकर, पप्पु शेख, रमेश चिलवेरी, गुरूनाथ कोळी, गणेश म्हंता, रेखा आडकी, राधा आवार, महेश उंडाळे, संजीव शेट्टी, अक्षय नंदाल आदि उपस्थित होते. *●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆===========*
*फोटो मॅटर :- सिव्हिल हॉस्पीटल मधील झालेल्या पार्किंग घोटाळ्याची चौकशी करून संबंधीतांवर कारवाई करावी या मागणीसाठी महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सहाय्यक अधिष्ठता मॅडम यांना निवेदन देतांना विष्णु कारमपुरी (महाराज), पप्पु शेख, गुरूनाथ कोळी, रमेश चिलवेरी आदि दिसत आहेत.*