लोकदर्शन👉मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
औद्योगिक क्षेत्रात प्रदूषण रोखण्यासाठी वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे असे मत गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी लखमापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलताना व्यक्त केले,
महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर च्या राष्ट्रीय सेवा योजनेचच्या वतीने स्वातंत्र्य च्या अमृत महोत्सव अंतर्गत लखमापूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात व रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले,याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार धोटे यांनी वृक्षारोपण चे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संचालक तथा गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ अनिल चिताडे,जेष्ठ संचालक विठ्ठलराव थिपे,रामचंद्र सोनपितरे,प्राचार्या स्मिताताई चिताडे, दानशूर महिला श्रीमती गिरीजाबाई मडावी,देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष दादापाटील आस्वले,तंटामुक्ती चे अध्यक्ष पुरुषोत्तम पिंपळशेंडे,माजी सरपंच सौ,निर्मलाताई तोडासे,उपप्राचार्य विजय आकनूरवार,होते.
मंदिराच्या परिसरात तसेच रस्त्याच्या दुतर्फा कडुनिंब, अशोका, उंबर,व इतर वृक्षांची लागवड अतिथी च्या हस्ते करण्यात आली, वृक्षारोपण केलेल्या सर्व वृक्षांची जोपासना करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे, याप्रसंगी दानशूर महिला श्रीमती गिरीजाबाई मडावी यांचा सत्कार प्राचार्या स्मिताताई चिताडे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ, साडी,पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
याप्रसंगी डॉ, अनिल चिताडे,विठ्ठलराव थिपे, प्राचार्या स्मिताताई चिताडे,यांनी मार्गदर्शन केले,
संचालन व आभार प्रदर्शन प्रा, सुधीर थिपे यांनी केले .
याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, गावकरी उपस्थित होते.
,